आजकाल समाजात काहीही घडू शकते. दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात ज्या फारच वेदना दायक असतात. अशीच एक घटना गाजियाबाद मध्ये होळीच्या दिवशी घडली ही घटना फारच चित्त थरारक आहे. सुखाचे दिवस कधी दुःखामध्ये परावर्तित होईल याचा नेम नाही.
खर तर होळी हा आनंदाचा दिवस आहे परंतु या आनंदाच्या दिवशी जर एखादी दुःखद घटना घडली तर तो दिवस त्या परिवारासाठी आनंदाचा नसून दुःखाचा आहे. होळीच्या सणावर कुटुंबात मृत्यूची बातमी येताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली, त्यामुळे होळीच्या सणाचे दुःखात रूपांतर झाले. शहरातील अग्रसेन मार्केटमध्ये असलेल्या कॉलनीत दीपक गोयल हे कुटुंबासह राहतात.
गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये होळीच्या सणाचे रूपांतर एका कुटुंबासाठी शोकसागरात झाले. येथे एका जोडप्याचा अंघोळ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी म्हणजे बुधवारी मुरादनगर येथील अग्रसेन मार्केटमध्ये असलेल्या घरात आंघोळ करत असताना अचानक गॅस निर्माण झाल्याने दोघेही बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
होळीच्या सणावर कुटुंबात मृत्यूची बातमी येताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली, त्यामुळे होळीच्या सणाचे दुःखात रूपांतर झाले. शहरातील अग्रसेन मार्केटमध्ये असलेल्या कॉलनीत दीपक गोयल हे कुटुंबासह राहतात.
होळीचा सण साजरा केल्यानंतर ते बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, दीपक गोयल आणि त्यांची पत्नी जास्त गॅस निर्मितीमुळे बेशुद्ध झाले. हे पाहून कुटुंबात खळबळ उडाली. दोघांनाही तातडीने गाझियाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.