आपल्याला माहित असेल की प्रेमात पडलेल्या माणसाला आजुबाजूला काय चाललंय हे दिसतं नाही. म्हणूनच कदाचित प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला कोणाची पर्वा नसते. प्रेमात लोकं एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच त्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. पण कालांतराने हे खूप बाष्कळपणाचंही वाटत पण त्या वयात हे होतंच.
आता अशीच गोष्ट या प्रेमामुळे घडली आहे जी आपल्याला थोडी विचित्र आणि धक्कादायक नक्कीच वाटेल चला तर जाणून घेऊ कि नेमके काय घडले आहे. बिहारमधील एका नवविवाहित मुलीने लग्नानंतर आपल्या पतीबरोबर राहण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर या नव्याने लग्न झालेल्या मुलीने तिच्या मैत्रिणीबरोबर राहण्याचा आग्रह धरला.
ही अजब गजब लव्ह स्टोरी बिहारमधील बेगूसरायची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच एका युवतीचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर त्या मुलीने समलैं-गिक असल्याचे उघड केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविवाहित मुलीचे एका मुलीवर म्हणजेच आपल्याच मैत्रिणीवर प्रेम होते आणि लग्नाआधीपासूनच त्या एकत्र राहत होत्या.
पण मुलीच्या कुटुंबियांनी तिला जोर जबरदस्तीने इतर ठिकाणी लग्न करण्यास भाग पाडले. पण लग्नानंतर मुलीने आपल्या पतीबरोबर राहण्यास सरळ नकार दिला आणि घर सोडण्याचा आग्रह धरला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
14 नोंव्हेबर रोजी रांची येथे राहणाऱ्या पूजाचे लग्न बेगूसराय येथील अंकित कुमार नावाच्या युवकाशी झाले होते. लग्नानंतर पूजा अंकितबरोबर बेगूसरायकडे राहायला आली. पण लग्नाच्या काही दिवसानंतर पूजाने अंकितसोबत राहण्यास नकार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने तिच्या नवऱ्याला म्हणजेच अंकितला आपण समलैंगिक असल्याचे सांगितले.
आणि तिने आपल्या मैत्रिणीकडे जाण्याचा आग्रह धरला, अर्थात त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. पूजाने आपल्या नवऱ्याला सांगितले की ती गेल्या 2 वर्षांपासून आपल्या जवळच्या जोडीदाराबरोबर समलिं-गी रहात आहे आणि आता तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. पण गुरुवारी पूजाची जोडीदार सपना वर्मा बेगूसराय येथे अंकितच्या घरी पोहोचली आणि तिने पूजाला घेऊन जाण्याचा आग्रह धरला.
सपनाने पूजाच्या घरी येऊन खूप गोंधळ घातला. त्यानंतर अंकितने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी या सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर सपना आणि पूजाने पोलिसांना त्यांची प्रेमकथा सांगितली आणि सांगितले की आम्ही रांचीमधील कपड्यांच्या दुकानात एकत्र काम करायचो. जिथे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आम्ही दोन वर्षे एकत्र राहत होतो.
पण याचदरम्यान पूजाचे लग्न अंकितशी झाले, पण हे लग्न पूजाला करायचं नव्हतं. पण कुटुंबातील सदस्यांच्या दबावामुळे तिला हे लग्न करावे लागले. पूजाच्या म्हणण्यानुसार, तिला आपल्या पतीबरोबर राहायचे नव्हते कारण ती सपनावर खूप प्रेम करत होती. आता पूजाला आणि सपनाला लग्न करायचं आहे आणि एकत्र जीवन जगण्याची त्याची इच्छा आहे.
पूजा आणि सपनाबद्दल हे ऐकून पोलिसांनी अंकितला समजावून सांगितले, त्यानंतर अंकितने पूजाला सपनाबरोबर जाऊ दिले. पण या प्रकरणात नाहक बिचाऱ्या अंकितचे खूप मोठ्या प्रमाणत हाल झाले.