1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण हा चित्रपट आज सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट सोनी मॅक्सवर दर दोन-तीन दिवसांत प्रसारित होतो. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय दक्षिण प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्या रघु मुख्य भूमिकेत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वर्षानंतर सौंदर्या रघु यांचे निधन झाले. सौंदर्या रघुचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर होती.
तिच्या कुटूंबातील सदस्यांना तिची डे ट बॉडीही मिळाली नाही. हे दिनांक 17 एप्रिल 2004 रोजी झाले. भाजपा आणि तेलगू देसम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ती करीमनगरला जात होती. सौंदर्या रघु ही चार सीटर खासगी विमानाने सकाळी ११ वाजता बेंगळुरूमधील जक्कूर एअरफील्डवरून उड्डाण केले. 100 फूट वर गेल्यानंतरच विमान कोसळले. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ अमरनाथ हिंदु जागरण समितीचे सचिव रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते.
या घटनेत केवळ चार जणांचा मृ त्यू झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांनी आपल्या मृ त्यूच्या काही दिवस आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. सौंदर्या रघु 31 वर्षांची असतानाच तिचा मृ त्यू झाला. तीचे खरे नाव सौम्य सत्यनारायण होते. सौंदर्या रघुचा जन्म 18 जुलै 1972 रोजी कोलार कर्नाटक येथे झाला. तीचे वडील उद्योगपती आणि कन्नड चित्रपटात लेखक होते ज्यांचे नाव के.के. एस. ते नारायण होते.
मृत्यूच्या 1 वर्षापूर्वी म्हणजेच 2003 साली त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर जी. एस. रघु बरोबर तिचा विवाह झाला होता. बातमीनुसार वर्ष २०१० मध्ये जी. एस. रघुचे दुसरे लग्न अर्पिता नावाच्या मुलीशी झाले होते. १९९८ मध्ये सौंदर्या रघुला विचारले गेले की तिला नेहमी अभिनेत्री व्हायचे आहे का तर सौंदर्या रघुने सांगितले होते की तिच्या मनात चित्रपट ही शेवटची गोष्ट आहे. माझे वडील एक चित्रपट निर्माते होते. मी त्यांच्याबरोबर फिल्म सेटवर जायचे.
सौंदर्या रघुचा पहिला आणि शेवटचा हिन्दी सिनेमा:-
या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री सौंदर्या रघु आता या जगात नाही. सौंदर्याने 1992 मध्ये गंधरवा या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. तिने कन्नड तेलुगू तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये एकूण 100 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सौंदर्याला 6 साउथ फिल्मफेयर अवॉर्ड मिळालेले आहेत. सूर्यवंशम हा सिनेमा सौंदर्या रघुचा पहिला आणि शेवटचा हिन्दी सिनेमा ठरला.अमिताभ बच्चन यांचा डबल रोल असलेला सूर्यवंशम हा सिनेमा 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. 7 कोटीमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी 12 कोटी 65 हजारांचा गल्ला जमवला होता.
सौंदर्या आणि जयासुधा यांना रेखाचा आवाज:-
या सिनेमाचं दिग्दर्शन ईव्हीव्ही सत्यनारायण यांनी केलं होतं. या सिनेमात सौंदर्या आणि जयासुधा यांच्या आवाजासाठी डबिंग रेखाने केलं होतं. सूर्यवंशम हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा सूर्यवमसम चा रिमेक होता. या सिनेमाचं शूटिंग गुजरात हैद्राबाद आणि पोलोन्नारुवा कॅन्डी श्रीलंकामध्ये झाली होती. बंगालमध्ये हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. कोलकाताच्या मेट्रो सिनेमामध्ये या सिनेमाने 100 दिवस पूर्ण केले होते.
हा सिनेमा सोनी मॅक्स वर इतक्यावेळा का दाखवला जातो? असा प्रश्न आपल्यालाअनेकदा पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचं कारण म्हणजे ‘सोनी मॅक्स’ने या सिनेमाचे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहे. आता पर्यंत यामधील 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. होय. हा सिनेमा आणखी 80 वर्षांपर्यंत आपल्याला पाहावा लागणार आहे.
वारंवार सूर्यवंशम हा सिनेमा दाखवण्यामागे आणखी एक कारण आहे. हा सिनेमा 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. त्याचं वर्षी सेट मॅक्स हे चॅनल लॉन्च झालं होतं. आता सेट मॅक्स हे सोनी मॅक्स झालं आहे. ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा आणि सेट मॅक्स चॅनल हे दोन्ही एकाच वर्षी आले. दोन वर्षांपूर्वी सोनी मॅक्सची मार्केटिंग हेड वैशाली शर्मा हिने एका मुलाखतीत सांगितले होते चॅनलने सूर्यवंशम या सिनेमाचे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा सिनेमा वारंवार दाखवला जातो.