घरात 4 मूलींचा जन्म झाल्यामुळे वडिलांना आला होता राग, आज संपूर्ण बॉलिवूड चालतंय त्यांच्याच जीवावर, फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल..

Bollywood Entertenment Latest update

भारतात स्त्रीला देवीचा दर्जा देण्यात आला आहे. हिंदू धर्मात लोक स्त्रीला देवीचे रूप मानतात. जर स्त्री नसेल तर जगातुन मानवाचे अस्तित नाहीसे होईल. परंतु आज या कलयुगात महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आजही लोक मुलीला शापापेक्षा कमी समजत नाहीत. स्त्री ही जगाची मूलभूत सूत्रधारक आहे हे माहीत असूनही लोक तिचा आदर करत नाहीत.

परंतु असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की लोकांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला आहे.परंतु अजूनही अशी काही मागासलेली गावे आहेत जिथे मुली जन्माला आल्यावर अशुभ मानले जाते. पण कदाचित त्या लोकांना हे ठाऊक नसेल की आजच्या युगात स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत.

त्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालत आहे. मुलगी झाल्यावर लोक म्हणतात की अभिनंदन तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. पण लोकांचा यावर खरोखर विश्वास आहे का? या जगात स्त्रीचे मोठे योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा पाया आहे. ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्याच घरात माता लक्ष्मी राहते.

आजच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना मागे टाकले आहे. पण एकेकाळी घरात मुलींचा जन्म हा शाप मानला जात असे. शक्ती मोहन, नीति मोहन, मुक्ती मोहन आणि कीर्ती मोहन यांच्या वडिलांची देखील अशी विचारसरणी होती. आता तुम्ही असा विचार करत असाल की ह्या कोण आहेत? तर नीती मोहन, मुक्ति मोहन, आणि शक्ती मोहन आज बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे.

आज मोहन सिस्टर्स बॉलीवूडवर राज्य करत आहेत. पण एक काळ असा होता की त्यांचे वडील ब्रिज मोहन शर्मा 4 मुलींच्या जन्मामुळे खूप रागावले होते. त्यांना 4 मुलींचे वडील होणे मान्य नव्हते. पण त्यांच्या मुलींमुळेच आज लोक त्यांना ओळखतात. आता त्यांना खात्री झाली आहे की मुली कुणापेक्षाही कमी नसतात. चला तर जाणुन घ्या या मोहन बहिणी कोण आहेत आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे काय योगदान आहे..

नीति मोहन

नीती मोहन या चार बहिणींमध्ये मोठी आहे. नीति आज बॉलिवूडची एक नामांकित गायिका आहे. तिने आतापर्यंत बर्‍याच चित्रपटांत गाणी गायली आहेत. ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ चित्रपटाच्या ‘इश्क वाला लव’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिचे भरपुर गाने हिट झाले. आज प्रत्येकाला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे.

शक्ती मोहन

शक्ती मोहन आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आहे. ती डान्स इंडिया डान्स रिअॅलिटी शोची विजेतीही राहिली आहे. आजकल तिला अनेक रियालिटी शोमध्ये जज म्हणून पाहिले जाते.

मुक्ति मोहन

आता येते मुक्ती मोहन. मुक्ती मोहन शक्ती मोहन प्रमाणेच कोरियोग्राफर आहे. तिने बर्‍याच चित्रपटांत कोरियोग्राफी केली आहे. मुक्ति हि भारतातील एक प्रसिध्द कोरियोग्राफर आहे.

कीर्ती मोहन

कीर्ती मोहन चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. कीर्ती तिच्या बहिणींप्रमाणे चित्रपटसृष्टीत नाही. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असूनही ती एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *