असा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…

Entertenment Latest update

प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.

जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे, याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती होण्यास मदत मिळेल. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे.

पण हे झाले विकसनशील देशा बाबतीत पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल कि या जगात असे अनेक देश आहेत ज्या देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे आज आपण अशाच एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की वाढती लोकसंख्या पाहून संपूर्ण जग त्रस्त आहे.

भारत असो वा चीन, प्रत्येक देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळे जण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये सरकारने काही काळापूर्वी कठोर नियम देखील बनवले होते. या अंतर्गत, ज्यांना एकापेक्षा जास्त बालके किंवा मुले आहेत त्यांना बर्‍याच सुविधा तेथील सरकारने नाकारल्या आहेत.

पण हा नियम जरी आता काढून टाकला गेला असला तरी अद्यापही कमी मुले जन्माला घालण्याचा आग्रह जनतेला केला जात आहे. भारतातही ‘हम दो हमारे दो’ या घोषणेने जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या कुटूंबाना अनेक सरकारी लाभ नाकारले जातात.

पण आज आम्ही आपल्याला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे एखाद्या स्त्रीने जर 7 पेक्षा जास्त अपत्ये जन्माला घातली तर तिला सुवर्णपदक दिलं जातं. एवढेच नव्हे तर या महिलेला पाणी व घरगुती खर्च देखील सरकारकडून केला जातो.

आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव कझाकिस्तान असे आहे. या देशाचे सरकार महिलांना अधिक अपत्ये घालण्यासाठी प्रोत्साहित करते आहे. ज्या महिला 4 पेक्षा अधिक मुलांना जन्माला घालतात त्या महिलांना अनेक सुविधा दिल्या जातात, जो पर्यंत ती मुले 21 वर्षांची होत नाहीत.

तो पर्यंत त्या महिलाना घराचा खर्च आणि रेशन दिले जाते. दुसरीकडे, एखाद्या महिलेला ६ मुले असल्यास तिला शासनाकडून रौप्य पदकासह पाणी आणि घरगुती खर्चासाठी पैसे मिळतात आणि जर 7 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला आली तर या सुविधांसह सुवर्णपदक दिले जाते.

तसेच काही रोख रक्कम सुद्धा दिली जाते. हे रेशन तसेच पाणी आणि घरगुती खर्च महिलांना मासिक भत्ता म्हणून दिले जाते. कझाकस्तानमध्ये 1944 पासून ही विचित्र परंपरा चालू आहे. तेव्हापासून हा पुरस्कार येथे अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना देण्यात येतो.

कझाकस्तानच्या सामाजिक विभागातील अक्साना या सांगतात की अधिकाधिक मुले जन्माला कशी येतील याचा सरकारी धोरणामध्ये समावेश आहे. वास्तविक या देशातील लोकसंख्या इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारला आपल्या देशाची लोकसंख्या वाढवायची आहे.

जेव्हा देशाची लोकसंख्या वाढते, तेव्हा तो देश अधिक शक्तिशाली देखील होतो. त्याच वेळी, अत्यल्प लोकसंख्या असल्याने, जगात त्या देशाला कोणतीही विशेष ओळख मिळत नाही. म्हणूनच ही योजना या देशामध्ये अनेक वर्षांपासून राबवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *