ब्लेकला वाटले होते की त्याने आपल्या प्रेमी सोबत लग्न केले आहे. त्याचे त्यासाठीचे दीर्घ नियोजन होते आणि तो त्याचे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत एकत्र घालवणार होता, परंतु काही वर्षानंतरच त्याला त्या मुलीचे एक रहस्य कळले. त्याची पत्नी म्हणजेच लोरी ही कधीच ब्लेकला त्याच्या वैयक्तिक लॉकरजवळ जाऊ देत नव्हती.
परंतु एके दिवशी जेव्हा त्याने कुतूहल म्हणून ते लॉकर उघडले तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसला. 2003 मध्ये, ब्लेक हा टेक्सासमध्ये शिकत असताना, त्याला लोरी एरिका केनेडी नावाची मुलगी भेटली आणि तो त्वरित तिच्याकडे आकर्षित झाला आणि एका वर्षानंतर या दोघांनी लग्न केले. ही एक परिपूर्ण नात्याची सुरुवात होती.
किमान ब्लेकला तरी असेच वाटले होते पण काही दिवसांनंतर ब्लेक असा विचार करत होता की त्या मुलगीला आपण कधीच भेटलो नसतो तर बरे झाले असत. कारण आपणास सांगू इच्छितो की लोरी नेहमीच तिच्या वैयक्तिक गोष्टी गुप्त ठेवत असे; तिने फक्त ब्लेकला सांगितले होते की तिचे बालपण खूप अडचणीत गेले आणि तिचा तिच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही.
किंवा संपर्क सुद्धा नव्हता. ब्लेकने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले कारण तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. दुसरीकडे, त्याच्या कुटुंबास लोरीबद्दल सुरुवातीपासूनच शंका होती. पण त्याला हे नंतर कळाले. कुटुंबातील लोकांच्या मनात लोरीबद्दल शंका असूनही, ब्लेकने 2004 मध्ये तिच्यासोबत लग्न केले आणि त्यांच्या लग्नात एका मैत्रिणी शिवाय इतर कोणीही नव्हते.
त्यानंतर ते काही दिवसांनी टेक्सास येथे स्थायिक झाले. ब्लेक आपल्या मैत्रिणीशी म्हणजेच लॉरीशी लग्न केल्याने अत्यंत आनंदित होता. कारण तो एक नवे जीवन जगणार होता. टेक्सासमध्ये शिफ्ट झाल्याच्या काही महिन्यांनंतर ब्लेक आणि लोरी यांनी बाळासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली.
पण मूल होण्यामागे त्यांना बऱ्याच समस्या येत होत्या कारण लोरीने याच्या अगोदर एकापेक्षा जास्त गर्भपात केले होते. पण डॉक्टरांच्या मदतीने इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन करून शेवटी लोरी पुन्हा गरोदर राहिली. त्यामुळे दोघेही खूप आनंदी होते पण ते फार काळ टिकू शकले नाही …
त्यांना मुलगी झाली आणि तिच्या जन्मानंतर आयुष्यात आनंद येईल असे वाटले होते परंतु सर्व उलट घडले. जन्मानंतर लगेचच लोरीने पतीपासून आणि सासरच्या लोकांपासून दूर जायला सुरवात केली. तिला आपल्या मुलीबद्दल जास्त काळजी होती आणि तिने कोणालाही तिच्या जवळ येऊ दिले नाही, अगदी ब्लेकच्या आईलाही हात लावण्याची परवानगी नव्हती.
बरेच प्रयत्न करूनही लोरीने कोणालाही तिच्या मुलीजवळ येऊ दिले नाही. ब्लेकचे कुटुंब तिचे हे वागणे सहन करू शकले नाही आणि ब्लेक, त्याचे कुटुंब तसेच लोरी यांच्यात तणाव इतका वाढला की लोरी नैराश्यात गेली.
पण जेव्हा याना समजले की डोक्यावरून पाणी जात आहे तेव्हा त्या दोघांनी घटस्फो-ट घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी वयाच्या 42 व्या वर्षी लोरीने आत्महत्या केली आणि आपल्या आयुष्यात ही दुर्घटना कशी घडली हे ब्लेकला समजले नाही. अचानक त्याचे संपूर्ण आयुष्य कसे उध्वस्त झाले? त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.