बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची ओळख केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. तिने तिच्या सौंदर्यामुळे नाही तर अभिनयाच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि तिच्या सौंदर्यामुळे तिला प्रोजेक्ट्स मिळत गेले. सुष्मिता सेनला ब्युटी क्वीन तसेच फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 1994 मध्ये अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर मिळाल्या होत्या.
तिने वयाच्या १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स १९९४ चा ताजही जिंकला होता. पण सध्या सुष्मिता सेनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता सेन ही बिझनेसमन आणि क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर ललित मोदीला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द ललित मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर ही माहिती शेअर केली असून, त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, ते सध्या सुष्मिता सेनला डेट करत आहेत.
पण नुकतेच सुष्मिता सेनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये तिने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा खुलासा केला आहे, हे प्रकरण 2006 मधील आहे जेव्हा मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन एका चित्रपटात काम करत होते. एकत्र या चित्रपटाचे दिग्दर्शन कल्पना लाजमी यांनी केले होते. या चित्रपटाचे नाव होते चिगारी, जो त्यावेळी बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नव्हता.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेनचेही बरेच इं-टि-मे-ट सीन्स होते. सुष्मिता सेनेला या सीन्सबद्दल खूप अस्वस्थ वाटत होती पण दिग्दर्शकाने जास्त दबाव दिल्यानंतर तिला ते करावे लागले. मिथुनसोबत जेव्हा हा सीन चित्रित केला जात होता, त्यावेळी सुष्मिता सेनच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि चिंता स्पष्टपणे दिसत होती.
डायरेक्टरने कट कट करताच सुष्मिता एक मिनिटही तिथे न थांबता ग्रीन रूमच्या दिशेने गेली आणि तिथेच रडू लागली. जेव्हा चित्रपटाच्या युनिटने याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मिथुनने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. जेव्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांना हे समजले तेव्हा त्यांचा यावर विश्वासच बसला नाही.
आणि त्यांनी सुष्मिताला समजावून सांगितले की, मिथुन चक्रवर्तीबद्दल तिचा काहीतरी गैरसमज झाला असावा कारण ती मिथुनला ओळखते, ते असे कधीच करू शकत नाही. पण सुष्मिताने कल्पना लाजमीचे ऐकले नाही आणि तिने मिथुनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजतागायत तिने मिथुनसोबत काम केलेले नाही.