जेव्हा विवाहित नागार्जुनच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती तब्बू, एका पायावर करायला तैयार व्हायची सगळं काही, 10 वर्षे डेट केल्यानंतर, या कारणामुळे तुटले होते त्यांचे नाते…

Bollywood Entertenment Latest update

आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीवर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू दीर्घकाळापासून अभिनय जगताशी जोडली गेली आहे. तब्बू ही अशीच एक अभिनेत्री आहे जिने प्रत्येक पात्राला न्याय दिला आहे. आणि त्यामुळेच तिच्याकडे आजही चित्रपटांचा भरणा आहे. 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या तब्बूने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.

तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.या चित्रपटांमध्ये काम करत असताना तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यांशीही जोडले गेले, तरीही ती वयाच्या ४९ व्या वर्षी सुध्दा कुमारी आहे. एकेकाळी तब्बू आणि अभिनेता नागार्जुन यांचे नातेही चर्चेत होते. आज आपण या दोघांची अधुरी प्रेमकहाणी जाणून घेऊया.

4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या तब्बूने ‘पहला पहला प्यार’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती पहिल्यांदा अभिनेता ऋषी कपूर सोबत दिसली होती ज्यात या दोघांची जोडी लोकांना खूप आवडली होती. यानंतर तब्बूने ‘चांदनी बार’, ‘कालापानी’, ‘मकबूल’, ‘माचिस’ आणि ‘विजयपथ’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

सुपरस्टार नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तब्बूचे नाव चर्चेत आले. दोघांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले पण तरीही त्यांचे नाते लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचले नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण होते नागार्जुनचे लग्न.होय.. नागार्जुन आधीच विवाहित होता, तरीही तो तब्बूच्या प्रेमात वेडा होता.

आणि त्यात तब्बू स्वतः नागार्जुनच्या प्रेमात पडली होती. अशा परिस्थितीत दोघांनी जवळपास 10 वर्षे गुपचूप एकमेकांना डेट केले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तब्बू आणि नागार्जुन यांची पहिली भेट ‘निन्ने पेल्लादाता’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले. नागार्जुन विवाहित होते पण तरीही त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले.

असे म्हटले जाते की, तब्बू नागार्जुनवर खूप प्रेम करत होती आणि त्याला भेटण्यासाठी वारंवार ती मुंबईवरून हैदराबादला जात असे. त्याचवेळी नागार्जुनही तब्बूला भेटण्यासाठी मुंबईत येत असे. त्यानंतर असे झाले की, तब्बूने हैदराबाद येथे नवीन घर घेतले.जेव्हा त्यांचे नाते हळूहळू वाढू लागले तेव्हा तब्बूला समजू लागले की,

नागार्जुन आपल्या पत्नीला कधीही सोडणार नाही. अशा परिस्थितीत तब्बूने 10 वर्षांचे हे नाते संपवले आणि 2012 मध्ये ती नागार्जुनपासून वेगळी झाली. विशेष म्हणजे नागार्जुननंतर तब्बू कधीच कोणाच्या प्रेमात पडली नाही आणि ती आजही कोणाशी रिलेशनशिपमध्ये नाही. वयाच्या ४९ व्या वर्षीही ती अविवाहित आहे आणि आनंदी जीवन जगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *