विकीने केला खतरनाक खुलासा, म्हणाला – या कारणामुळे आमच्यात सारखे भांडन होत असतात – ती मला काही करूनच देत नाही…

Bollywood Entertenment Latest update

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात लाडके स्टार्सपैकी एक आहेत. दोघांची क्यूट जोडी चाहत्यांना आवडते. पण लग्नाच्या 7 महिन्यांनंतर विकी कौशलने कतरिना आणि त्याच्यात कशावरून भांडण झाले हे सांगितले. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

चाहते दोघांच्या जोडीवर जीव ओवाळून टाकतात.विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी काही काळ एकमेकांना डेट केले, त्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी सवाई माधोपूरच्या ‘सिक्स सेन्सेस फोर्ट’मध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. सोशल मीडियावरही विकी कौशल आणि कतरिना कैफच्या प्रेमाने भरलेल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

पण आता लग्नाच्या 7 महिन्यांनंतर विकी कौशलने खुलासा केला आहे की, तो आणि कतरिना कैफमध्ये कशावरून सर्वात जास्त भांडण झाले आहे. विकी कौशल अलीकडेच करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये शेरशाह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत खास पाहुणे म्हणून आला होता. यादरम्यान विकीने करणसोबत त्याच्या प्रेम आणि वैवाहिक आयुष्याविषयी खूप काही बोलले.

पण जेव्हा करण जोहरने त्याला विचारलं की लग्नानंतर तुझं आणि कतरिना कैफमध्ये कशावरून भांडण होतंय का, तेव्हा विकी कौशलने लगेच उत्तर दिलं की, दोघांची भांडणं ही फक्त वॉर्डरोबबद्दल आहे, कारण कतरिना कैफचा संपूर्ण वॉर्डरोबवर कब्जा आहे. आधी कपाटाच्या एका कोपऱ्यात विकीचे कपडे असायचे, पण आता संपुर्ण कपाट कतरिनाच्या कपड्यांनी व्यापलेले आहे.

आणि विकी कौशलचे कपडे ठेवण्यासाठी फक्त एक छोटा ड्रॉवर उरला आहे,आणि यावरूनच दोघांमध्ये कधीकधी भांडण होतात. विकी कौशलने करण जोहरच्या शोमध्ये कतरिना कैफच्या आयुष्यात आल्यानंतर काय बदलले हे देखील सांगितले. विकी म्हणाला, ‘जेव्हाही मी एखाद्या चित्रपटावर किंवा मोठ्या गोष्टींवर थोडा जास्त टेंशन घेत असतो.

तेव्हा कतरिना कैफ मला नेहमी गोष्टी समजावून सांगत असते, आणि मला ग्राउंडेड ठेवते’. जेव्हा विवाहित विक्की कौशलला विचारण्यात आले की त्याला त्याच्या नंतर आता इंडस्ट्रीमध्ये कोणाचे लग्न बघायचे आहे. तर आधी विक्की कौशल म्हणाला की आता सर्वांनीच लग्न केले आहे, पण नंतर सिद्धार्थकडे बघून तो म्हणाला की आता फक्त हाच बाकी आहे याचेच बघायचे आहे.

विकी कौशल 2022 आणि 2023 मध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने जवळपास सर्वच चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. लक्ष्मण उत्तेरकरच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटात विकी कौशल पहिल्यांदाच सारा अली खानबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे, तर विकी गोविंदा नाम मेरा, द ग्रेट इंडियन फॅमिली, डंकी आणि सॅम बहादूर या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *