महेश भट्ट नेहमीच वादात राहत असले तरी यावेळी एका पाकिस्तानी अभिनेत्रीने केलेल्या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुमारे 17 वर्षांपूर्वी 2005 मध्ये महेश भट्ट यांनी ‘नजर’ नावाचा चित्रपट बनवला होता, या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मीराने मुख्य भूमिका साकारली होती.मीराचा बॉलीवूडमधला पहिला चित्रपट नजर हाच होता.
आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट होते, मात्र महेश भट्टसोबत न्यू कमरने काम करणे हे जणू स्वप्नच आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मीराने सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला आहे, तिचा पहिलाच चित्रपट नजर हा फ्लॉप ठरला असला.तरी, मिराने केलेल्या महेश भट्ट यांच्यावरील आरोपात अनेक गुपिते उघड झाली आहेत.
पाकिस्तानी अभिनेत्री मीराने या चित्रपटात खूप इं-टि-मे-ट सीन्स केले होते.त्यानंतर तो मीराला इतर दिग्दर्शकांसोबत काम करू देत नव्हता. महेश भट्ट यांनी मीराला एकप्रकारे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. आणि मीरा जेव्हा कुठलाही चित्रपट साइन करण्याचे बोलत असे तेव्हा महेश भट्ट तिच्यावर चित्रपट साइन न करण्यासाठी दबाव टाकत असत.
पुढे मीराने सांगितले की, महेश भट्टमुळे तिचे बॉलिवूडमधील करिअर संपले. त्यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष भाई यांनी मीराला त्यांच्या चित्रपटात साईन केले जेव्हा महेश भट्ट यांना ही गोष्ट समजली. तेव्हा तिच्यावर महेश भट खवळले आणि मीराला अनेक लोकांमध्ये थप्पड मारली, यानंतर मीराने महेश भट्टवर गंभीर आरोप केला.
मीराने महेश भट्टबद्दल पुढे बोलताना सांगितले की, महेश भट्ट यांना त्यांनी इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करावे असे वाटत नव्हते,दिवसा ते तिला मुलीसारखे वागवायचे पण रात्री आय लव्ह यू म्हणायचे आणि तिच्यासोबत रोमँटिक व्हायचे. प्रियकर जसा प्रेयसीसोबत बसतो तसा तो तिच्यासोबत बसायचा, तो तिला एकांतात मारत सुध्दा होता.