राखी सावंत ही बॉलिवूडची ड्रामा क्वीन आहे.राखी सावंतने भलेही फिल्मी दुनियेत नाव कमावले नसेल पण ती नेहमीच सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.राखी तिच्या असामान्य शैली आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आजकाल राखी तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबत रोजच मीडियामध्ये दिसत असते.आणि अनेकदा चर्चेचा विषय देखील बनवलेली असते.
दरम्यान तिचा हसण्याचा आणि मस्करी करतानाचा व्हिडिओ आणि फोटोज् सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. नुकताच राखीचा बॉयफ्रेंड आदिल दुबईहून परतला आहे आणि आता राखीचा आनंद गगनात मावत नाहीये,ती गेल्या अनेक दिवसांपासून त्याची वाट बघत होती. त्यामुळे ती बॉयफ्रेंड आदिलसोबत मीडियामध्ये मस्ती करताना दिसत आहे.
नुकतेच राखी सावंत आणि आदिल मीडियामध्ये दिसले होते आणि त्यादरम्यान एका पत्रकाराने राखी सावंतच्या मानेवर आढळलेली खूण पाहिली.आणि विचारले की मानेवर ही खूण कशी काय झाली आहे,तुम्हाला कोणता किडा चावला आहे का? यावर राखीने लगेच उत्तर दिले, “हो मला किडाच चावला आहे.”
त्यानंतर राखी सावंत तिच्या प्रियकर आदिलकडे पाहते आणि म्हणते की हा “लहान सहान किडा नसून खूप मोठा किडा आहे.” राखीच्या या वक्तव्यावर तिचा प्रियकर आदिल शरमेने हसताना दिसत आहे. राखी सावंत आणि आदिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणि त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांची अशी स्टाइल खूप आवडली आहे. त्यामुळे चाहते अनेकदा त्यांच्या फोटोज् वर प्रेम व्यक्त करत असतात.वृत्तानुसार, राखी सावंत लवकरच तिचा प्रियकर आदिलसोबत विवाहबंधनात अडकणार असून ती सध्या आदिलसोबत लिव्ह इन रिलेनशिपमध्ये आहे,ते दोघे मुंबईत एका फ्लॅटमध्ये एकत्र राहतात.