बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने 2001 मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले, आज अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासोबत खूप खूश आहे, आता त्याचे नाव इतर कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडले जात नाही पण अस देखील नाही की इंडस्ट्रीमध्ये अक्षयच्या नावासोबत दुसऱ्या अभिनेत्रींचे नाव जोडले गेले नाही. अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे, अगदी अक्षयचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर देखील होते.
काजोल
इंडस्ट्रीची सुपरहिट अभिनेत्री काजोल, अजय देवगणसोबतच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. हीच अभिनेत्री काही काळापूर्वी अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी असायची. इंडस्ट्रीत एक वेळ अशी आली आहे जेव्हा अभिनेत्री काजोल अक्षय कुमारच्या प्रेमात पडली होती. होय, याचा खुलासा तिचा खास मित्र करण जोहरने केला आहे.
करण जोहरने सांगितले की, एके काळी बॉलीवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार काजोलचा क्रश असायचा आणि कॉफी विथ करण या शो दरम्यान काजलनेच पती अजय देवगणसमोर याची कबुली दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 1991 मध्ये हिना चित्रपटाच्या पार्टीदरम्यान करण काजोलला भेटला होता.
आणि त्यामध्येच काजोलला अक्षय कुमारवर क्रश झाला होता आणि पार्टीमध्ये त्याला भेटण्याची तीव्र इच्छा तिला झाली होती. अक्षय कुमारला भेटण्यासाठी ती इतकी वेडी होती की तिने संपूर्ण पार्टीमध्ये अक्षय कुमारला शोधले आणि जेव्हा तो भेटला तेव्हा तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.
पूजा बत्रा
ही पहिली अभिनेत्री आहे जिच्यासोबत अक्षय कुमारच्या अफेअरची बातमी आली, ती म्हणजे पूजा बत्रा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा बत्रा आणि अक्षयचे खूप दिवसांपासून अफेअर होते, पण त्यावेळी अक्षय कुमार हे फारसे प्रसिद्ध सेलिब्रिटी नव्हते, त्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही,पण अक्षयला स्टारडम मिळताच तो पूजापासून दूर झाला.
आयशा जुल्का
खिलाडी चित्रपटादरम्यान अक्षयचे नाव आयेशा जुल्कासोबत जोडले गेले होते, ज्यामध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते, लोकांना त्यांची केमिस्ट्री इतकी आवडली होती की,हळूहळू त्यांच्या प्रेमाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र, दोघांनीही कधीच हे नातं उघडपणे स्वीकारलं नाही.
रवीना टंडन
रवीना टंडन आणि अक्षय कुमार या दोघांचे किस्से आजही इंडस्ट्रीमध्ये गुंजतात, दोघांनीही मोहरासारखे हिट चित्रपट दिले आणि दरम्यान प्रेमात पडले. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, रवीना टंडन या नात्याबद्दल खूप गंभीर होती तर अक्षयला कोणत्याही प्रकारची कमिटमेंट नको होती. कदाचित याच कारणामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. दोघांचे नाते आणि ब्रेकअप यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.
रेखा
अक्षय आणि रेखाचे नाते हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले अफेअर आहे. दोघांनीही ते मान्य केले नसले तरी त्यावेळी अक्षयची गर्लफ्रेंड असलेल्या रवीना टंडनने रेखाला तिच्या मर्यादा जाणून घ्याव्यात असे मीडियासमोर सांगितले होते. रवीनाचे हे वक्तव्य अनेक दिवसांपासून चर्चेत होते. खिलाडी के खिलाडी या चित्रपटादरम्यान रेखा अक्षयच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात होते. त्यावेळी रवीनाने रेखाला अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले.