क्रोध आणि बंधन सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रंभाच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये वाहनाची अवस्था बघायला मिळते. बंधन, जुडवा आणि क्रोध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा एक भाग असलेल्या बॉलीवूडमधील रंभा या अभिनेत्रीच्या गाडीचा अपघात झाला आहे.
या अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी रंभा सोबत तिची मुले आणि तिची आया देखील कारमध्ये होती. रंभाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे हे फोटो स्वतः रंभाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना रंभाने लिहिले की, ‘मुलांसह शाळेतून परत येत असताना चौरस्त्यावर एका कारने आमच्या कारला धडक दिली. गाडीत मी, मुले आणि आया होतो. आम्हा सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत पण आम्ही सुरक्षित आहोत. माझी धाकटी मुलगी साशा अजूनही रुग्णालयात आहे. वाईट दिवस आणि वाईट वेळ, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.
तुमच्या प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रंभा आणि तिचे कुटुंब सुखरूप आहे. तरीही त्यांची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. रंभाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिल्या फोटोमध्ये तिची मुलगी दिसत आहे.जिला डॉक्टर उपचारासाठी घेऊन जात आहेत. दुस-या आणि तिसर्या फोटोमध्ये अपघातग्रस्त कार दिसत आहे, जीची अवस्था अत्यंत वाईट आहे.
कारच्या एअर बॅग उघड्या झाल्याचे दिसते. रंभाच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या तब्येतीची विचारणा केली आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी असून तिने हिंदी तसेच तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभाने काही काळ भोजपुरी सिनेमातही काम केले आहे.