ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने लग्नानंतर बॉलिवूडपासून दुरावा निर्माण केला. प्रियांकाने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा देश सोडून परदेशात शिफ्ट झाली आहे. आणि आता ती हॉलिवूड इंडस्ट्रीसाठी काम करते. प्रियांकाने लग्नानंतर भारत सोडला.
आणि ती तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील चित्रपटांदरम्यान अनेक कलाकारांना डेट केले आहे. त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. याचा खुलासा त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. प्रियांका काही वर्ष अमेरिकेत मावशीच्या घरी राहीली.
आणि त्यांनी तिथेच शिक्षण घेतले. त्यानंतर तिने तिथे बॉयफ्रेंड बनवला. त्यावेळी ती दहावीत शिकत होती. त्यामुळे या नात्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. प्रियंका चोप्राने आपल्या पुस्तकात सांगितले होते की, एकदा तिची मावशी घरी नव्हती, त्यावेळी ती तिच्या प्रियकरासोबत टीव्ही पाहत होती.
त्यादरम्यान तिची मावशी घरी आली आणि त्यानंतर प्रियांकाने तिच्या प्रियकराला कपाटात लपवले. तेव्हा मावशीला संशय आला आणि त्यांनी कपाट उघडण्यास सांगितले. प्रियांकाने कपाट उघडले असता कपाटात मुलाला पाहून मावशी चांगलीच संतापली. आणि ही सर्व कहाणी प्रियांकाच्या आईला सांगितली.
आणि या घटनेनंतर प्रियांका भारतात परतली. देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर निक जोनाससोबत लग्न केले होते. निक जोनास प्रियांकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. सध्या प्रियांका निक जोनस तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.