बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरसाठी पतीचे घर सोडले आणि घटस्फोटानंतर नवी सुरुवात केली. यामध्ये मल्लिका शेरावत ते डिंपल कपाडिया यांसारख्या बड्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. बॉलीवूड स्टार्स त्यांच्या प्रेमप्रकरणांपासून ते लग्न, ब्रेकअपपर्यंत सर्वच गोष्टींमुळे चर्चेत राहतात. बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत.
ज्यांनी लग्नानंतर कुटुंबासाठी आपलं करिअर अर्धवट सोडलं. हे पाहिल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटले. आज बॉलीवूड लाईफच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी करिअरसाठी वैवाहिक जीवनापासून स्वतःला दूर केले आहे. या यादीत मल्लिका शेरावत, डिंपल कपाडियासह अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. चला तर मग ही यादी पाहू.
राखी: तुम्ही अभिनेत्री राखीला करण अर्जुन या चित्रपटात पाहिले असेलच, तिने १९७३ मध्ये गुलजार यांच्याशी लग्न केले होते. यानंतर ती बॉलिवूडपासूनही दूर झाली पण काही वर्षांनी म्हणजेच १९७४ मध्ये ती गुलजारपासून विभक्त झाली. वेगळे झाल्यानंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले.
विमी: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक विमी आहे ती तिच्या लग्नाला आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणायची. पती निवडताना चुकीच्या निर्णयामुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं. त्यानंतर विमीने पतीला सोडले. मात्र त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करता आले नाही, कारण तिला खूप उशीर झाला होता.
डिंपल कपाडिया: बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाने अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. बॉलीवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने स्वतःला फिल्मी जगापासून दुर केले. त्यानंतर 1982 मध्ये राजेश खन्नाला सोडून ती बॉलिवूडमध्ये परतली.
मल्लिका शेरावत: इमरान हाश्मीच्या ‘म-र्ड-र’ चित्रपटात तिच्या बो-ल्ड सीन्सने सर्वांना आश्चर्यचकित करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने लग्न केले होते पण तिचा पती करण गिलला तिने चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. यामुळे ती 1 वर्षानंतर पतीपासून विभक्त झाली आणि घर सोडून मुंबईत आली.
चित्रांगदा सिंग: या यादीत बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगच्या नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्रीचे लग्न झाले होते. त्यांचा बालपणीचा मित्र गोल्फर ज्योती रंधावाशी त्यांचे लग्न झाले होते. चित्रांगदाने लग्नानंतर कुटुंबासोबत राहावे अशी ज्योतीची इच्छा होती. पण अभिनेत्रीला तिचं करिअर करायाच होत, त्यामुळे 2014 साली दोघांचा घटस्फोट झाला आणि ती पतीपासून वेगळी झाली.
माही गिल: या यादीत अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री माही गिलच्या नावाचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिनेही करिअर सुरू करण्यापूर्वी लग्न केले होते. यानंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अदिती राव हैदरी: या यादीत बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे नाव पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अभिनेत्रीने 2006 मध्ये लग्न केले होते, पण एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आणि घटस्फोटानंतर, अदितीने 2008 साली ‘दिल्ली 6’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.