ऋतुराज गायकवाडने 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. 2021 मध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएलमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. फॅफ डू प्लेसिससह ऋतुराज गायकवाडने अनेक सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली.
ऋतुराजच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, त्याला अजून कोणी गर्लफ्रेंड असल्याची ऑफिशियल बातमी हाती आली नाही. पण मागे काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री सायली संजीव हिच्याशी ऋतुराजचे नाव जोडले गेले होते. सायली संजीव ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.
सायली संजीव यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे झाला. सायली संजीव या नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार संजीव चांदसरकर यांच्या कन्या आहेत. सायलीचे सुरुवातीचे शिक्षण धुळ्यातच झाले. आणि पुढील शिक्षण नाशिकमधून केले. 2016 मध्ये सायली संजीवला झी मराठीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
सायली संजीवने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सायली संजीव सोफ्यावर बसून हसत आहे. ऋतुराज गायकवाड यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट केली, ‘वाह’. सायली संजीवने ऋतुराजच्या कमेंटला उत्तर देताना 3 हार्ट इमोजींनी उत्तर दिले आहे. तेव्हापासून दोघांच्या नात्याबद्दल अफवा सुरू झाल्या होत्या.
सायली संजीव अभिनेत्रीशिवाय मॉडेल देखील आहे. सायली संजीवने क्विकर, बिर्ला आयकेअर आणि डू इट सारख्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. सायली संजीवला झी मराठीवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘काहे दिया परदेस’ मधील ‘गौरी’ ही व्यक्तिरेखा मिळाली. जी लोकांना खूप आवडली आणि त्यामुळे सायली मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली.
तसेच सायली संजीवला ‘परफेक्ट पाटी’ आणि ‘गुलमोहर’ यांसारख्या टीव्ही मालिकांसाठीही खूप प्रशंसा मिळाली. तसेच सायलीने “बस्ता” या मराठी सिनेमामध्ये ही लीड कॅरेक्टर म्हणून काम केले आहे. आणि अलीकडेच सायलीने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतही काम करत आहे. सायलीला त्यासाठी सुध्दा खूप दाद मिळत आहे.