विद्या बालन ही बॉलीवूडमधील अशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे जी अजूनही त्यांच्या पात्रांसाठी ओळखली जाते. त्यांनी साकारलेली उत्तम पात्रे आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. विद्या बालनने निःसंशयपणे अनेक महान बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा तिची कारकीर्द काही विशेष नव्हती.
तेव्हा फक्त दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या एका फोनने तिला अश्रू अनावर झाले होते. खरं तर, विद्या बालनच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली होती जेव्हा तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप होत होते. आपल्या एका मुलाखतीत याविषयी बोलताना तिने सांगितले होते की, एक दिवस महेश भट्टचा फोन आल्यानंतर तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
विद्या म्हणाली होती की, “रविवारी सकाळी महेश भट्ट साहेबांनी मला फोन केला, आणि म्हणाले – विद्या मला माफ कर पण हमारी अधुरी कहानी चालली नाही, वाईटरित्या फ्लॉप झाली.” विद्या बालनने तिच्या मुलाखतीत पुढे सांगितले की, महेश भट्टच्या कॉलनंतर मला खूप रडू आले. अशा स्थितीत सिद्धार्थ मला चेंबूरच्या साईबाबा मंदिरात घेऊन गेला.
मुसळधार पाऊस पडत होता पण मी गाडीत ज्या प्रकारे रडत होते, तो पाऊस सुध्दा त्याचा मुकाबला करू शकत नाही. मी विचार करत होते की, मी काय चूक केली आणि त्यापूर्वी मी काय चांगले केले? पण मग मी स्वतःला सांगितलं की सगळं विसरून या प्रवासाचा आनंद घे. कारण जर कधी लग्न तुटले तर त्या लग्नात कधीच आनंदाचे क्षण नव्हते, असे म्हणता येते नाही.
विशेष म्हणजे 2015 साली ‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विद्या बालन या चित्रपटासाठी खूप उत्सुक होती. कारण दिग्दर्शक महेश भट्टसोबत काम करण्याची त्यांची इच्छा या चित्रपटातून पूर्ण होत होती. या चित्रपटासोबतच अभिनेत्रीचे ‘ घनचक्कर’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’ आणि ‘बॉबी जासूस’असे तीन चित्रपट सतत फ्लॉप ठरले होते.