बॉलिवूड अभिनेता किंग खानला आपण सगळेच ओळखतो. जिथे शाहरुखच्या अभिनयाबद्दल चर्चा होते तिथे शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच चर्चेत असतो. बॉलीवूडमध्ये एकमेकांसोबतचे अफेअर किंवा नाते तुटल्याचे अनेकदा आपण पाहिले आहे. पण शाहरुख खानसोबत ही समस्या कधीच पाहिली नाही.
गौरी खानशी तो नेहमीच प्रामाणिक राहिला आहे. गौरी खानशी त्यांचे संबंध खूप दिवसांपासून आहेत. शाहरुख खान आणि गौरी खानची जोडी बॉलिवूडमधली सर्वोत्कृष्ट जोडी मानली जाते. खरे तर गौरी खान इतकी वर्षे शाहरुख खानसोबत राहत आहे. पण गौरी खान शाहरुख खानच्या एका सवयीने प्रचंड नाराज आहे. खुद्द गौरी खानने करण जोहरच्या शोमध्ये हे कबूल केले आहे.
कॉफी विथ करणच्या शोमध्ये गौरी खान तिच्या मैत्रिणींसोबत दिसणार आहे. गौरी खानने येथे शाहरुख खानबद्दल खुलासा केला, आणि असे सांगितले. गौरी खान म्हणाली की, जेव्हाही घरी पार्टी असते, तेव्हा ती शाहरुख खानच्या या सवयीमुळे खूप नाराज होते.आणि म्हणाली की, घरी पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांना तो गाडीत सोडण्यासाठी जातो.
कधी कधी असं होतं की बाकीचे पाहुणे त्यांना शोधत राहतात. आणि तो रस्त्यावर उभा असतो.पुढे गौरी खान म्हणाली की, कधी-कधी घरापेक्षा रस्त्यावर पार्टी होतेय असं तिला वाटतं. गौरी खान म्हणाली की शाहरुखच्या अशा आदरातिथ्याची सवय तिला कधीकधी त्रास देते. गौरी खानचा हा एपिसोड डिस्ने हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.