आपल्या गोंडस हास्य आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का हिने हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. आयशा जुल्का ही ९० च्या दशकातील सुपरहिट हिरोईनपैकी एक होती. तिचे मोठे डोळे आणि मा-दक स्मितहास्य यामुळे सर्वांनाच तिचे वेड लागले होते..
पण याच दरम्यान आयशा जुल्काने लग्न करून फिल्मी दुनियेला सोडचिठ्ठी दिली. आयशाच्या लग्नाला जवळपास 17 वर्षे झाली आहेत पण ती अजून आई बनलेली नाही. आता आयशा जुल्का हिने यामागचे कारण सांगितले असून करिअरच्या शिखरावर असताना तिने बॉलिवूड का सोडले याचा देखील खुलासा केला आहे.
आयशा जुल्काने 2003 मध्ये कन्स्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले होते. तेव्हापासून त्यांनी चित्रपट जगताला टाटा बाय-बाय म्हटले होते. त्यानंतर जेव्हा आयशा जुल्का यांना बराच काळ मुल झाले नाही, तेव्हा सर्वांनीच या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले. इतकंच नाही तर मुलाखतीदरम्यान आयशाला याबाबत विचारण्यात आलं होतं.
पण आता आयशाने खुलासा केला की, तिला मुलं का झाली नाहीत? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आयशा म्हणाली, “मला मुले नाहीत कारण मला ती नको होती. मी माझ्या कामात आणि समाजाच्या सेवेत बराच वेळ आणि शक्ती खर्च करते. आयशा म्हणाली, “माझा निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी चांगला असावा अशी माझी इच्छा आहे.
समीरसारखा जीवनसाथी मला मिळाला हे माझे खूप मोठे भाग्य आहे. समीरने मला जसं व्हायचं होतं तसंच ठेवलं, माझ्यावर कोणताही दबाव टाकला नाही आणि माझ्या निर्णयाचा आदर केला. सध्या आयशा जुल्का प्राण्यांसाठी काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी काही स्क्रिप्ट्सही वाचत आहे.
याशिवाय आगामी काळात ती लवकरच बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरिज, टीव्ही शोमध्येही दिसणार असल्याचे आयशाने सांगितले आहे. आयशा जुल्काने 1991 मध्ये ‘कुर्बान’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात आयशा झुल्का प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत दिसली होती. ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला पडली आणि आयेशा झुल्का रातोरात सुपरस्टार बनली.
आयशाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सुंदर हास्याने सर्वांची मनं जिंकली होती. यानंतर आयशाने मन्सूर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात आयशा अभिनेता आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. आयशाच्या करिअरमधला हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला आणि तिला खूप पसंती मिळाली.
त्यानंतर आयशाने तिच्या करिअरमध्ये ‘खिलाडी’, ‘वक्त हमारा है’, ‘हिम्मतवाला’, ‘आंटी 420’, ‘दलाल’, ‘रंग’, ‘मेहरबान’, ‘संग्राम’ आणि ‘मासूम’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. केले.चित्रपटांमध्ये मोठे स्थान मिळवल्यानंतर आयशाने चित्रपट जगतापासून स्वतःला दुरावले होते. बॉलिवूडपासून दूर राहण्याचा तिचा निर्णय योग्य होता, असे आयशा म्हणते. तिने आपापल्या परीने आयुष्याचा आनंद लुटला.