बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी शाहरुख खान आणि गौरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. बॉलीवूडच्या प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या शाहरुख आणि गौरी हे अनेक वर्षांपासून प्रेमात आहेत, आणि नेहमीच एकमेकांसोबत आनंदी आहेत. संपूर्ण इंटरनेट या दोघांच्या प्रेमकथांनी भरलेले आहे.
पण आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, ती खूपच अनोखी आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही ती याआधी कधीच ऐकली नसेल. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला जवळपास २८ वर्षे झाली आहेत. होय, पण हे लग्न इतकं सोपं नव्हतं कारण गौरी ही हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहे. आणि शाहरुख खान मुस्लिम कुटुंबातील आहे.
त्यामुळे त्यांच्या लग्नात अनेक अडथळे आले. त्याचवेळी, तेव्हा शाहरुख खानला चित्रपटसृष्टीत यश मिळवता येत नव्हते, ही समस्या होती. म्हणजे तोपर्यंत तो संघर्षच करत होता. अखेर 26 ऑगस्ट 1991 रोजी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केले. शाहरुख आणि गौरी लग्नबंधनात अडकले, आणि लग्नात गौरीचे नाव आयशा करण्यात आले.
एका मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणाला होता की, “गौरीचे बहुतेक नातेवाईक या लग्नावर खूश नव्हते, कारण ते जुन्या पद्धतीचे होते. ते आपसात बोलत होते की, मुलगा मुस्लिम आहे, तो मुलीलाही मुस्लिम बनवेल किंवा तिचे नाव बदलेल. तो पुढे म्हणाला की, मी गंमतीने म्हणालो की, मी गौरीला नमाज अदा करण्यास सांगितले आहे. लग्नानंतर तिला बुरखा घालायचा आहे.
त्याने एवढेच सांगितले, आणि हे ऐकून गौरीचे संपूर्ण कुटुंब शांत झाले. या मुलाखतीत शाहरुख म्हणतो की, ‘ते सर्व पंजाबी भाषेत बोलत होते आणि त्यावेळी मी गौरीला म्हणालो की, ‘चल गौरी बुरखा घालून नमाज अदा करू’, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांना वाटले की मी गौरीचे आधीच धर्मांतर करून घेतले आहे.