बी टाऊनमध्ये कोणतेही सेलिब्रेटी कपल एकत्र स्पॉट झाले की सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत तर्कवितर्क लावले जातात. आजकाल हे प्रमाण खूपच वाढले आहे. यातील काही सेलिब्रेटी त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न करतात तर काही जण जाहीरपणे त्याची कबुली ही देतात. त्यापैकी आलिया आणि रणबीर आहेत, त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
आणि आता त्यांनी एकमेकांसोबत लग्न देखील केले आहे. दोघांनी ही त्यांच्या नात्याबाबत कधीच काही लपवले नाही. त्यांनी जाहिररीत्या त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. 2018 मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात हे कपल पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाते ऑफिशिअल बनवले होते.आणि नंतर ते अनेक ठिकाणी सोबत स्पॉट झाले होते.
त्यांनतर त्यांनी 2022 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा 2022 साली सर्वत्र ट्रेंड आहे, हे दोघेही बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले, ज्याची सर्वत्र चर्चा होती. लग्नानंतर दोघेही चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
अशीच एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये लग्नानंतर आलियाचा दृष्टिकोन बदलल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण काय आहे ते मी पुढच्या लेखात सांगेन. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरची आई, प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी म्हणाली की, “आलिया भट्टला सून बनवून आणल्यापासून, आम्ही घरात एक दिवस सुध्दा एकत्र बसून बोलू शकलो नाही.
” ती पुढे म्हणाली की, आलिया भट्टला सून बनवल्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे. पण नीतू कपूर आणि तिच्या मुलीने हे सर्व केवळ मजाक म्हणून सांगितले आहे. 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्टसोबत सात फेरे घेतल्यानंतर रणबीर कपूर आपले आनंदी जीवन जगत आहे, दोघेही अनेकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात.