कियारा अडवाणीने काही वेळातच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत चांगले स्थान मिळवले आहे. आता तिची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. ती आत्तापर्यंत सर्वच मोठ्या सिनेमांमध्ये दिसली आहे. ती बहुतांशी सिनेमामध्ये सुपरहिट ठरली आहे. कियारा अडवाणीने 2014 साली प्रदर्शित झालेल्या फगली या बॉलिवूड चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर ती भूल भुलैया 2, कबीर सिंग, शेरशाह, जुग जुग जिओ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अलीकडेच कियारा अडवाणी करण जोहरच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करणमध्ये पाहुणी म्हणून पोहोचली होती, जिथे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये शेअर केली होती. कियारा अडवाणीपूर्वी, या शोमध्ये रणवीर सिंग-आलिया भट्ट आले होते.
तसेच अक्षय कुमार-समंथा रूथ प्रभू, सारा अली खान-जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे आणि विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे फिल्मी सितारे देखील कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये दिसले आहेत. करण जोहरच्या शोच्या 8 व्या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी तिच्या कबीर सिंग या चित्रपटाचा मुख्य अभिनेता शाहिद कपूरसोबत पोहोचली.
यादरम्यान कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रा तिचा खास मित्र असल्याचा खुलासा केला. जेव्हा करण जोहरने शाहिद कपूरला विचारले की तू बेडवर कोणती भूमिका करतोस. याशिवाय त्याने अभिनेत्रीलाही हाच प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कियारा लाजते आणि म्हणते की माझी आई देखील हा एपिसोड पाहणार आहे. यानंतर करण जोहरने अभिनेत्रीला विचारले की, तुझ्या आईला तू अजूनही व्ह-र्जि-न आहेस.
असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देणे अभिनेत्रीसाठी सोपे नव्हते. ती म्हणाली हो, मला असे वाटते. यानंतर करण तिला पुढे प्रश्न करतो की, तुला असे म्हणायचे आहे का की तू सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना कियाराने चातुर्य दाखवत सांगितले की, मी नकार देत नाही आणि हो देखील म्हणणार नाही. ती म्हणाली की, सिद्धार्थ आणि मी जवळच्या मित्रांपेक्षा खूप जास्त जवळ आहोत.