अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत काम करणं जितकं सोपं वाटतं तितकंच खरं तर ते अवघड असतं. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रींना चित्रपटाचा दिग्दर्शक आणि नायक या दोघांच्या बोलण्याचे पालन करावे लागते. जे दिग्दर्शक बोलेल त्यांना ते करावे लागते. इच्छा नसतानाही त्यांना ते सीन्स शूट करावे लागतात, जे त्यांना करायचे नसते.
मात्र, करिअर घडवण्याच्या नादात अभिनेत्री प्रत्येक मर्यादा ओलांडते.आजच्या पोस्टमध्ये आपण चित्रपटसृष्टीतील अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने चित्रपटातील एक दृश्य शूट करण्यासाठी ग-र्भ-वती होण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर खरोखर मुलाला जन्म देखिल दिला. ऐकायला खूप विचित्र वाटतं.
पण ते पूर्णपणे खरे आहे. क्षणाचाही विलंब न लावता जाणून घेऊया त्या अभिनेत्रीबद्दल जिने असा निर्णय घेतला. आम्ही बोलत आहोत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता मेननबद्दल. ती साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली. सध्या ती 47 वर्षांची आहे. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1974 रोजी चंदीगडमध्ये झाला.
एक काळ असा होता की श्वेता मेननच्या सौंदर्याचे लोक वेडे असायचे. चाहते त्यांच्या फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत असत. श्वेता मेननच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने दोन लग्न केले. 2007 मध्ये तिचा पहिला पती बॉबी भोसलेपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तिने दुसरे लग्न केले. तिचे दुसरे लग्न सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीवलसन मेनन यांच्याशी झाले.
श्वेता मेननने चित्रपटाचा सीन शूट करण्यासाठी तिच्या दुस-या लग्नानंतर गरोदर राहण्याचा निर्णय घेतला होता. तिने आपल्या चित्रपटात लाइव्ह डिलिव्हरी चित्रित केली होती. जवळजवळ हे लाईव्ह चित्रण 45 मिनिटे चालले. जेव्हा लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तरीही त्यांचा चित्रपट काही विशेष करू शकला नाही आणि फ्लॉप झाला.