बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोण ओळखत नाही. तिने काहीच चित्रपटांमधून तिची चांगली ओळख निर्माण केली आहे. लोक तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या चुळबुल्या अंदाजाचे फॅन आहेत.सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी आहे.
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, पण ती तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने पापा सैफ अली खानसमोर तिच्या मामासोबत लग्न करण्याविषयी सुरू चर्चा होती. साराचे मामा कोण आहेत आणि मुलीच्या या प्रकरणावर सैफ अली खानने काय प्रतिक्रिया दिली?
ते आम्ही तुम्हाला सांगतो.हा किस्सा बॉलीवूड निर्माता करण जोहरच्या लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ च्या जुन्या सीझनचा आहे, जिथे सारा अली खान तिचे वडील सैफ अली खानसोबत पोहोचली होती. यादरम्यान करण जोहरने साराला तिच्या लग्नाबद्दल विचारले. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने सांगितले की, मला रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे.
साराचे हे उत्तर ऐकून सैफ अली खानही थोडं थक्क झाला. एवढेच नाही तर रणबीर कपूर व्यतिरिक्त तिने कार्तिक आर्यनचे नाव देखील घेतले आणि सांगितले की तिला कार्तिकला डेट करायचे आहे. यावर सैफ अली खान हसला आणि म्हणाला की जर कार्तिककडे बँक बॅलन्स असेल तर तु त्याच्यासोबत डेटवर जाऊ शकतेस. सैफचे हे ऐकून साराही हसू लागली.