सैफ अली खान आणि करीना कपूर हे आज इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. त्यांच्या अफेअरपासून लग्नापर्यंत सगळंच एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यात अनेक गोष्टी घडल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सैफ करिनाच्या आयुष्याशी संबंधित असाच एक रंजक किस्सा सांगणार आहोत.
मात्र, या कथेपूर्वी तुम्हाला सांगतो की सैफ अली खानचे पहिले लग्न 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाले होते. या लग्नाच्या वेळी सैफ अली खानने चित्रपटात पदार्पण केले नव्हते, तर अमृताचे त्यावेळी इंडस्ट्रीत मोठे नाव होते. एवढेच नाही तर सैफ आणि अमृता यांच्या वयात मोठा फरक होता.
सैफ वयाने अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. आता सैफ-करीनाशी निगडीत त्या कथेकडे येऊया, मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये आलेल्या ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करिनाची जवळीक वाढू लागली होती.
या चित्रपटात करीना आणि सैफसोबत काम करणाऱ्या अक्षय कुमारलाही याची माहिती होती. यानंतर अक्षय कुमारने सैफला एक सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. अक्षयने सैफला सांगितले होते की, ‘बेबोला जपून वागव आहे, ती इंडस्ट्रीतील मोठ्या आणि डेंजरस कुटुंबातील आहे.अश्याप्रकारचा सल्ला अक्षयने ने सैफला दिला होता.