बॉलिवूड स्टार्सचे अफेअर असणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टार्सच्या डेटींगच्या बातम्या हेडलाईन बनत असतात. मात्र, एखाद्या अभिनेत्रीचे नावाजलेल्या राजकारण्याशी संबंध आल्यावर सर्वत्र चर्चेचा बाजार तापतो. लोक या विषयावर खूप रस घेतात. तसे, चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत, ज्यांचे देशातील बड्या नेत्यांशी प्रेमसंबंध आले आहेत.आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बिपाशा बसू आणि अमर सिंग : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूचे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अमर सिंह यांच्यासोबत अफेअर होते. 2006 मध्ये अशा बातम्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये खूप मथळे केले होते. त्यावेळी या दोघांमधील संवादाचे एक इं-टि-मे-ट कॉल रेकॉर्डिंगही समोर आले होते. सुरुवातीला दोघांनीही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नंतर अमर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की, त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी ही बातमी पसरवली जात आहे.
जयललिता आणि एमजी रामचंद्रन : जयललिता या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या, ज्यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्याशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जयललिता यांनी त्यांच्याकडून राजकारणातील सर्व युक्त्या शिकल्याचेही बोलले जाते.
राधिका कुमारस्वामी आणि डी कुमारस्वामी : राधिका कुमारस्वामी ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डी कुमारस्वामी यांच्या प्रेमात पडली होती. दोघांचे अफेअर चर्चेत होते आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केले.
सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे : राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे बऱ्याच दिवसांपासून अफेअर होते. दोघेही लग्न करू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या. पण नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.