नोरा फतेही अनेकदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते.अलीकडेच नोरा फतेही व्हाइट टॉप आणि ब्लू सिंपल जीन्समध्ये स्पॉट झाली होती. चाहत्यांनी तिच्या या लुकचे कौतुक केले, परंतु तिच्या चालण्याबद्दल तिला खूप ट्रोल केले गेले. एका युजरने म्हटले की ती कधीच सरळ का चालत नाहीस? तु नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असते माहीत नाही.
नोरा फतेही डान्सिंग दिवा वरून फॅशन दिवा बनली आहे. नोराचे स्टाइल स्टेटमेंट आणि सिझलिंग लूक अनेकदा चर्चेत असतात. नोराची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना तिचे वेड लावते. नोरा काहीही करून अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येते. सध्या सोशल मीडियावर नोराचे काही धमाकेदार फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये नोरा फतेहीने साधी निळी जीन्स आणि पांढरा टॉप घातला असला तरी, तिच्या स्टाईलवर चाहत्यांची नजर भलतीकडेच गेली आहे. ते म्हणतात की काही चांगल्याबरोबर वाईट सुध्दा येत असते. चाहते नोराच्या लूक आणि स्टाइलचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिच्या चालण्याच्या स्टाइलची खिल्ली उडवत आहेत.
एका युजरने सांगितले की तु सरळ का चालत नाही. दुसर्या वापरकर्त्याने म्हंटले की हीची चाल अशी कशी आहे,की नोरा वाकडी तिकडी चालत असते. नोरा फतेही अनेकदा मुंबईच्या शूट किंवा स्टुडिओमध्ये स्पॉट केली जाते. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा मागील म्युझिक व्हिडिओ ‘डान्स मेरी रानी’ खूप गाजला होता.
व्हिडिओतील नोराचा लूक शकीरापासून प्रेरित होता. या व्हिडीओमध्ये नोराने धमाकेदार डान्स केला. यावरून नोराला खूप ट्रोलही करण्यात आले. लोक तिला ‘स्वस्तातली शकीरा’ म्हणत होते. नोराची गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. झलक दिखला जा या शोमध्ये नोरा फतेहीला चाहते सध्या पाहत आहेत.
नोराच्या करिअरच्या सुरुवातीबद्दल सांगायचे तर तिने मॉडेल आणि टॅलेंट एजन्सी ‘ऑरेंज मॉडेल मॅनेजमेंट’ सोबत मॉडेलिंगला सुरुवात केली. या एजन्सीने नोराला भारतात पाठवले होते. नोराने अनेक ब्रँडसाठी अनेक जाहिराती केल्या. तिने 2014 मध्ये ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या बॉलीवूड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
तिने ‘डबल बॅरल’ (एक मल्याळम चित्रपट), ‘टेम्पर’, ‘बाहुबली: द बिगिनिंग’, ‘किक 2’ आणि ‘मिस्टर एक्स’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले.ज्यामध्ये तिने खास भूमिका दिली होती. 2018 च्या सुरूवातीला, तिने ‘लेडीज स्पेशल: टाइप्स ऑफ सिंगल गर्ल्स’ या YouTube चॅनल ‘द टाइमलाइनर्स’ वर वेब सीरिजमध्ये पदार्पण करून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.