करिश्मा कपूरचे या 6 लोकांसोबत होते शा’री’रिक सं’बं’ध? यादीत आहे या मोठमोठ्या दिग्गजांचा समावेश, तरी आज आहे एकटीच…

Entertenment Latest update

करिश्मा कपूर यांचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह लाईफ आणि अफेअर्सबद्दल सांगणार आहोत. अभिनेत्री करिश्मा कपूर, जीने 1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला, आणि आज तिला कुठल्याही परिचयाची गरज नाही.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो मनांवर राज्य करणाऱ्या करिश्माने फिल्मी दुनियेत खूप मोठे आणि अविस्मरणीय काम केले आहे. प्रेम कैदी या पहिल्या रोमँटिक ड्रामा चित्रपटाद्वारे वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करिश्माचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.

आजवर करिश्मा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. तिचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेले आहे. परंतु आज वयाच्या 47 व्या वर्षी देखील करिश्मा कपूर एकटीच आयुष्य घालवत आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह लाईफ आणि अफेअर्सबद्दल सांगणार आहोत.

अजय देवगण- करिश्मा कपूर आणि अजय देवगणची जोडीही एकेकाळी चर्चेत होती. असं म्हटलं जातं की करिश्माचं नाव आधी अजय देवगणसोबत जोडलं गेलं होतं. ‘जिगर’ चित्रपटात एकत्र काम करताना दोघांची जवळीक वाढली होती आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, नंतर दोघेही एकमेकांपासून दूर गेले.

गोविंदा- चित्रपटाच्या पडद्यावर गोविंदा आणि करिश्माच्या जोडीवर प्रेमाचा खूप वर्षाव झाला. 90 च्या दशकात, जेव्हा दोघांचे करिअर तेजीवर होते आणि दोघे एकत्र खूप चित्रपट करत होते, तेव्हा दोघांचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या.पण नंतर दोघांनीही एकमेकांपासूनचे अंतर वाढवले ​​आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.

सलमान खान- असे म्हटले जाते की, करिश्माचे सलमानसोबतही अफेअर होते. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच उघडपणे काही सांगितले नाही, किंवा त्यांच्या नात्याची कोणतीही माहिती समोर आली नाही.

अभिषेक बच्चन- अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची कहाणी वेगळी होती. दोघेही लग्न करणार होते पण काही कारणास्तव हे नाते पुढे जाऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, दोघे पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

संजय कपूर – यानंतर करिश्माने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. परंतु करिश्माचे लग्न यशस्वी झाले नाही. 2016 मध्ये तिने तिचा पती संजयपासून घटस्फोट घेतला.

संदीप तोष्णीवाल – संजय कपूरला घटस्फोट दिल्यानंतर करिश्मा सिंगल झाली. 2018 मध्ये अशी बातमी आली होती की करिश्मा बिझनेसमन संदीप तोष्णीवालला डेट करत आहे. मात्र या विषयावर फारशी चर्चा झाली नाही. आज करिश्मा एकटीच आयुष्य घालवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *