बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर परदेशात बरीच ओळख निर्माण केली. आज ती बड्या स्टार्ससोबत हॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसत आहे. मात्र, जेव्हा अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तिला खूप संघर्ष करावा लागला.
एवढेच नाही तर तिला शा-री-रि-क बनावटीमुळेही अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले.एकदा प्रियांका चोप्राने खुलासा केला होता की ती फिल्म इंडस्ट्रीत नवीन असताना बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. अभिनेत्रीने सांगितले की तिला इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा भेटलेल्या व्यक्तीने तिला तिच्या शरीराचे प्रमाण योग्य ठेवण्याचा सल्ला दिला होता.
साल 2000 मध्ये मिस वर्ल्ड म्हणून निवड झालेल्या प्रियांका चोप्राने तिच्या बायोग्राफी ‘अनफिनिश्ड’मध्ये अनेक खुलासे केले आहेत. तिने लिहिले की, चित्रपट निर्माता-दिग्दर्शकासोबत माझे काही मिनिटे संभाषण झाले. त्याने मला उभे राहण्यास सांगितले आणि नंतर दुसऱ्या बाजूला वळायला सांगितले. मी त्याचे म्हणणे पाळले.
आणि त्यानंतर त्याने मला सांगितले की तु बू-ब जॉब घेतला पाहिजे. तुमचा स्वत:चा जबडा नीट केला पाहिजे आणि तुमच्या नितंबात कुषणींग केली पाहिजे. त्याने मला सल्ला दिला की, जर तुला अभिनेत्री व्हायचं असेल तर तुला तुझ्या शरीराचं प्रमाण योग्य ठेवायला हव. तुमची इच्छा असल्यास, मी तुम्हाला लॉस एंजेलिसला पाठवू शकतो.
मी तिकडे एक चांगल्या डॉक्टर ओळखतो. प्रियंका चोप्राने पुस्तकात पुढे लिहिले की, हे सर्व ऐकून मी तिथून निघून आले आणि ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर मला खूप वाईट वाटले. माझ्या मनात विचार येऊ लागले की जर मी हे सर्व बदल घडवून आणले नाहीत तर मी अभिनेत्री होऊ शकत नाही. तेव्हा मीडियातील लोक मला सावळी म्हणायचे.
सध्या तिच्या फिल्मी करिअरव्यतिरिक्त प्रियांका चोप्रा तिच्या वैवाहिक आयुष्यातही खूप व्यस्त आहे. तिने अनेक वर्षांपूर्वी हॉलिवूड अभिनेता निक जोनाससोबत लग्न केले. अलीकडेच प्रियांका सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीची आई झाली आहे. यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त झाली आहे.