जग सत्य सांगते, ‘इश्क पे जोर नहीं..’ या ओळी केवळ गाणे नसून वास्तविक जीवनातील वास्तव सांगते. असं म्हणतात की जेव्हा प्रेम असतं तेव्हा त्याच्या पुढे काहीच दिसत नाही. प्रेम कोणाचा धर्म, जात पाहत नाही, कधी कधी लग्न झालेल्या लोकांच्याही प्रेमात पडताना आपण लोकांना बघतो.
आज आपण अशा काही बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या चाहत्यांची कमतरता नव्हती, परंतु प्रेमाच्या बाबतीत त्यांचे देखील हृदय एका विवाहित पुरुषासाठी धडधडू लागले. आणि त्यांनी प्रेमाखातर विवाहीत पुरुषांशी लग्न केलं,काही तर पहिल्या बायकोसोबत आयुष्य काढत आहेत.
शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा हे देखील आधीच विवाहित होते. त्यांनी पहिली पत्नी कविताला घटस्फोट देऊन शिल्पा शेट्टीशी लग्न केले. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत कविताने शिल्पावर तिचे कुटुंब तोडल्याचा आरोप केला होता.
राणी मुखर्जी – राणी मुखर्जी बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीच चर्चा असते की आदित्य चोप्राने आपल्या पत्नीला राणी मुखर्जीमुळे घटस्फोट दिला. मात्र, 2014 मध्ये एका मुलाखतीत राणीने या सर्व गोष्टी अफवा असल्याचे म्हटले होते. तिने सांगितले की, जेव्हा तिचा घटस्फोट झाला त्यानंतर ती आदित्यच्या जवळ आली होती.
कंगना रानौत – कंगना राणौत बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत ही अशीच एक अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. कंगना देखील विवाहित आदित्य पांचोलीच्या प्रेमात पडली आहे. ज्याचे आधीच जरीन वहाबशी लग्न झाले होते. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसले. पण हे नाते बरेच वादग्रस्त होते, कंगनाने आदित्यवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. जरीनच्या म्हणण्यानुसार, त्यांचे नाते साडेचार वर्षे टिकले.
श्रीदेवी – श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दलही सर्वांना माहिती आहे. श्रीदेवी जेव्हा बोनी कपूरच्या प्रेमात पडली तेव्हा तो मोना शौरीसोबत वैवाहिक जीवन जगत होता. बोनीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी लग्न केले.
हेमा मालिनी – ड्रीम गर्ल हेमा मालिनीही हिंदी चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्रला हृदय देवून बसल्या होत्या. धर्मेंद्र यांचाही विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला होता. प्रकाश कौरने घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे धर्मेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमाशी लग्न केले.