आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तसेच बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही देखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. त्या दोघांच्या अफेअर्सची चर्चा सुरू आहे.तिचा ‘लिगर’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात ती दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. विजय आणि अनन्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतीच अनन्या करणच्या शोमध्ये दिसली होती.करण जोहर आदित्य रॉय कपूरचे नाव घेत अनन्याला प्रश्न विचारताना दिसला होता.
अशा परिस्थितीत आदित्य त्यांच्याबद्दल काय म्हणतो हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत.आता अलीकडेच आदित्य रॉय कपूरने लग्नाच्या योजनांबद्दल सांगितले आहे. आदित्य रॉय कपूर हा इंडस्ट्रीचा एक असा हँडसम हंक आहे, ज्याच्यावर केवळ सामान्य मुलीच नाही,तर बॉलिवूडच्या सुंदरीही आपला जीव ओवाळून टाकतात.
करण जोहरने त्याच्या चॅट शोमध्ये अनन्या आणि आदित्य यांच्या नात्याबद्दल एक इशारा दिला होता. यावर अनन्या खूपच लाजताना दिसली. त्याचवेळी आदित्य दिसायला खूपच चांगला असल्याचे अनन्याने कबूल केले. आता अलीकडेच आदित्य रॉय कपूरने त्याच्या लग्नाविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
लग्नाच्या प्रश्नावर आदित्य म्हणाला- माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे. नशिबात असेल तर होईल. हे काही मी वेगळ सांगण्याची गरज नाही. मी आजमध्ये जगतो, त्यामुळे लग्न झालेच तर मी तयार असेल. मी अजून त्याबद्दल कोणतीही योजना केलेली नाही.पण मी लवकरच लग्न करणार आहे.