दुसऱ्यांच्या से’क्स लाईफ विषयी विचारल्यावर तुझ्या आईला हरकत वाटत नाही का? अमीर ला त्याच्या से’क्स लाईफ वर प्रश्न विचारल्यावर करणं’ वर भडकला अमीर…

Entertenment

करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेत असतो. करन जोहर येणाऱ्या सेलिब्रिटीना अश्याप्रकारचे प्रश्न करतो की, जेव्हा जेव्हा एखादा नवीन एपिसोड येतो, त्यानंतर त्याचे प्रश्न आणि सेलिब्रिटिंची उत्तरे व्हायरल होऊ लागतात. विशेषत: करण जोहर त्याच्या शोला भेट देणार्‍या सेलिब्रिटीशी त्यांच्या लैं-गि-क जीवनाबद्दल बोलतो.

हे प्रश्न आणि उत्तरे सर्वाधिक व्हायरल होतात, असे प्रश्न तो प्रत्येकाला विचारतो. अलीकडेच आमिर खान आणि करीना कपूर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या शोमध्ये पोहोचले होते. करीना कपूर आणि आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपटावर बहिष्कार टाकल्याची चर्चा सुरू आहे.

आमिर खानने या चित्रपटाबद्दल लोकांना आधीच सांगितले आहे की त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालू नका. आपलेही देशावर प्रेम असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले. करण जोहरच्या शोमध्ये करीना कपूर आणि आमिर खान आले तेव्हा करण जोहरने त्यांनाही अशाच प्रश्नांची उत्तरे विचारली.त्याने करीना कपूरलाही विचारले की,

मूल झाल्यामुळे तिच्या लैं-गि-क जीवनावर परिणाम झाला आहे का? तसे, करण जोहर प्रत्येक वेळी अशा प्रकारच्या भन्नाट प्रश्नांची उत्तरे सेलिब्रिटिंकडून घेत असतो. सेलिब्रिटीही या प्रश्नांची उत्तरे देणे टाळताना दिसतात पण करण जोहर कसा तरी त्यांच्या तोंडून सत्य बाहेर काढतो. जेव्हा करणने करीना कपूरला हा प्रश्न विचारला तेव्हा अमिर खान करणला म्हणाला की, 

करण तुझी आई तुला हे सर्व प्रश्न विचारताना काही बोलत नाही का? तुला इतरांच्या से-क्स लाईफबद्दल का जाणून घ्यायचे असते? त्यांनतर करीना कपूरनेही आमिर खानचा पाय खेचत बोलले की अमिर खानला एक चित्रपट बनवण्यासाठी 200 दिवस लागतात. तर अक्षय कुमार ४० दिवसांत चित्रपट बनवतो. त्यामुळे तिला अक्षय सोबत चित्रपट बनवायला आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *