नोरा फतेही बॉलीवूडची सेन्सेशनल क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या डिझायनर आणि खूप सुंदर कपडे आणि साड्या परिधान करताना दिसत आहे.ज्यामुळे चाहते तिच्या फोटोंवर खूप प्रेम करतात आणि तिला पुढे जाण्याची प्रेरणा देतात.आणि चाहत्यांना जे आवडत नाही.
त्यावरून ती अनेकदा ट्रोल होताना ही दिसते.अलीकडेच, अशाच एका ड्रेससाठी ती ट्रोल झाली आणि ट्रोलर्सनी तिच्या ड्रेसची तुलना नाईटीशी केली. काही दिवसांपूर्वी नोराचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती एका रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ज्युनियर’ च्या सेटवर जाण्यासाठी पोहोचते.
आणि जेव्हा ती तिची कार सोडते तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. ज्यामुळे ती तिची साडी सांभाळू शकत नव्हती आणि तिची साडी ओली होण्यापासून वाचवण्यासाठी एक गार्डही तिथे असतो. तिची साडी हातात धरून ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये पोहोचते पण ती आधीच खूप ओली होते. ज्यावर लोकांच्या खूप वाईट प्रतिक्रिया येत आहेत.
आणि युजर्स तिला नखरली क्वीन असे संबोधताना दिसत आहेत. तसेच काही यूजर्स लिहितात की जेव्हा कपडे हाताळता येत नाहीत तेव्हा ते का घालतात? तुम्ही लोकांना आपले गुलाम समजतात का? नोराला दररोज अशा ट्रोलर्सना सामोरे जावे लागते, तसेच लोकांनां असे वाटते की ती असे कृत्य करून भारतीय सभ्यतेचा अपमान करत आहे.
मात्र, यासागळ्या नंतरही तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या तिच्या चाहत्यांची कमी नाही. नोरा फतेही नुकतीच मुंबईतील एका मॉलच्या बाहेर स्पॉट झाली होती जिथे तिने हील्ससह मस्टर्ड कलरचा वन पीस घातला होता, ज्यावर तिला खूप ट्रोल केले गेले.आणि लोकांनी तिच्या ड्रेसची तुलना नाईटीशी केली.
इतकेच नाही तर ती कारमधून बाहेर पडली रस्त्यावरून चालली होती, तिची चाल सुद्धा थोडी वेगळी दिसत होती. जसे की तुम्ही मलायकाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आधी पाहिले असेल, आणि आता नोरा तिच्या ग्लॅमर आणि ग्रेससाठी ओळखली जात असली तरी नोरा त्याप्रमाणे चालताना दिसली.
त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांनी तिला मलायकाची कॉपी करतेय असे देखील बोलले.तिच्या हलक्या मेकअप लूकने ती खूपच सुंदर दिसत होती. नोराबद्दल सांगायचे तर, ती तिच्या प्रत्येक पोशाखाने सर्वांना आकर्षित करते आणि तिच्या चाहत्यांचे मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही.