गायक आणि संगीतकार बी प्राक आणि त्यांची पत्नी मीरा त्यांच्या दुस-या मुलाबद्दल खूप उत्सुक होते. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती. बुधवारी मीराने दुसऱ्या मुलाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काही तासांतच मुलाचा मृ-त्यू झाला.
ही माहिती शेअर करत प्राकने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. दोघेही आपल्या बाळाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. परंतु त्या नवजात मुलाच्या नशिबात आयुष्य खूप कमी होते. आणि जन्म झाल्यानंतर काही वेळातच त्याने शेवटचा श्वास घेतला.
पोस्ट शेअर करताना प्राक म्हणाला, मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, आमच्या मुलाचे जन्मानंतर लगेचच नि-धन झाले. सध्या आपण पालक म्हणून सर्वात वाईट काळातून जात आहोत. हे खूप वेदनादायक आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम आणि प्रयत्नांसाठी आभार मानू इच्छितो. आम्ही आतून तुटलेले आहोत, तुम्ही सर्वांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी ही विनंती.
”तेरी मिट्टी’ या गाण्यातून मिळाली होती ओळख
बी प्राक आणि मीरा यांनी 4 एप्रिल 2019 रोजी चंदीगडमध्ये लग्नगाठ बांधली. वर्षभरानंतर दोघेही मुलाचे आई-वडील झाले. अदाब असे या दाम्पत्याच्या मुलाचे नाव आहे. प्राकने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या मुलाच्या आगमनाची माहिती दिली होती.
केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याने प्राकला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी अनेक पंजाबी गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. नुकतेच त्याचे तुम इश्क नही करते हे गाणे रिलीज झाले आहे.