अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील स्टार जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची जोडी चाहत्यांनी सुपरहिट बनवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, दोघांनी 2001 मध्ये गुपचूप लग्न केले होते, त्यांच्या लग्नाची फारशी माहिती नव्हती. त्यांच्या लग्नात फक्त काहीच लोक सामील झाले होते.
लग्नानंतर दोघांनीही कधीच मागे वळून पाहिले नाही. आणि नेहमीच एकमेकांवर प्रेम केले. असे म्हटले जाते की अक्षयने ट्विंकल खन्नाला प्रपोज केले तेव्हा ती ब्रेकअपशी झुंजत होती आणि तिला कोणाच्याही प्रेमात पडायचे नव्हते. पण अक्षय कुमार हा एक नावाजलेला अभिनेता आणि दिसायला खूप स्मार्ट होता.
अक्षय आणि ट्विंकल 21 वर्षांपासून एकत्र आहेत. हनिमूनच्या दिवशी ट्विंकल खन्नाने मोठे गुपित स्वतःहून उघड केले होते, जाणून घेऊया काय आहे ते रहस्य. इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली आणि अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले आणि ट्विंकलने होकार दिला.
अक्षयने सांगितले की, जेव्हा त्याने अभिनेत्री ट्विंकलला पहिल्यांदा पाहिले, तेव्हाच त्याने तिच्याशी लग्न करण्याचा विचार मनात पक्का केला होता. अक्षय कुमारने सांगितले की, ट्विंकलमध्ये मला हवे असलेले सर्व गुण आहेत. त्यामुळे मी कायमच तिच्याकडे आकर्षित होत गेलो, आणि शेवटी ट्विंकलने सुध्दा माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला.
आणि आम्ही लग्न करून कायमचे एक झालो. अक्षय कुमारने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच हनिमूनला त्याला समजले होते की, तो ट्विंकलसोबत कधीही लढाईमध्ये जिंकू शकणार नाही. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की, लग्नानंतर आजवर ही दोघांमध्ये भांडण झाल्याची कोणतीही बातमी समोर आली नाही.