कंगना रनौतने केला खतरनाक खुलासा, म्हणाली – तो माझ्या जवळ यायचा आणि अयोग्यरीत्या माझ्या तिथे स्पर्श करायचा आणि मला…

Bollywood Entertenment Latest update

आपण सर्व अभिनेत्री कंगना रनौत हिला ओळखतच असाल. तिने तिच्या अभिनय कौशल्याने बॉलिवुडमध्ये मोठी जागा निर्माण केली आहे. तसेच ती तिच्या काही स्ट्रेट फॉरवर्ड वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिने बोललेले वक्तव्य खूप कमी वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

कंगना रनौत सध्या एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. हा शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शोमध्ये स्पर्धक अनेकदा स्वत:शी संबंधित आश्चर्यकारक खुलासे करताना दिसतात. पण, यावेळी शोची होस्ट, कंगना रणौत हिने स्वतःबद्दल एक अतिशय दुःखद खुलासा केला आहे. ज्याबद्दल ती खूप भावूक झाली आहे.

नुकतेच कंगना रणौतने शोमध्ये जे खुलासा केले ते तिच्या बालपणाशी संबंधित होते. कंगना राणौतने सांगितले की, ती बालपणात लैं-गि-क शो-ष-णाची शिकार झाली आहे. वास्तविक, शोच्या ताज्या भागात, स्पर्धक मुनव्वर फारुकीने त्याच्या बालपणीच्या आघाताबद्दल सांगितले. त्याच्या गुपिताबद्दल बोलताना त्याने सांगितले.

आजपर्यंत त्याने हे गुपित कोणाशीही शेअर केले नव्हते. तो फक्त 6 वर्षांचा असताना त्याच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडल्या. 4-5 वर्षे त्याला काहीच समजले नाही. पण, एक वेळ अशी आली की गोष्टी खूप वाढल्या. असे म्हणत मुनव्वर रडू लागला. हे ऐकून इतर स्पर्धकांसोबत कंगना रणौतही भावूक झाली. यानंतर तिने तिच्या बालपणाबद्दल सांगितले.

कंगना म्हणाली, ती देखील लैं-गि-क शो-ष-णाची कशी शिकार झाली आहे. कंगना म्हणाली की, दरवर्षी अनेक मुलांना यातून जावे लागते. परंतु, लोक सार्वजनिक मंचावर याबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात. अनेक मुलांना लहान वयातच नको असलेल्या स्पर्शाला सामोरे जावे लागते. या घटनेचा संदर्भ देताना ती म्हणते की, तीही बालपणी लैं-गि-क शो-ष-णाची शिकार झाली होती.

ती लहान असताना तिच्यापेक्षा मोठा मुलगा तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचा. पण, वयामुळे तिला समजलेच नाही की, त्याचे काय सुरू होते. कारण, लहान मुलांना काय चूक आणि काय बरोबर हे सांगितले जात नाही. आणि त्याच वेळी, काही मुलांना ही गोष्ट समजत नाही. असे म्हणत कंगना खूपच भावूक झाली. तसेच तेथे असलेले सर्वजण भावूक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *