नवविवाहित जोडपे अगदी आनंदी दिसत होते. दोघेही सणांना नातेवाईकांकडे हजेरी लावत होते. अजून बायकोच्या हातावरची मेंदी उतरली नव्हती संपूर्ण कुटुंब आनंदी होते. पण एके दिवशी पती-पत्नी दोघेही घराबाहेर गेले. पत्नी घरी आली पण नवरा गायब झाला.दुसऱ्या दिवशी त्याच्या मृ-त्यूची बातमी आली.हे बघून पत्नीसह सर्वजण आश्चर्यचकित झाले.
मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता आरोपी कोण आहे हे जाणून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. हे प्रकरण पश्चिम बंगालमधील हुगळीचे आहे. 13 मार्च रोजी बसू कुटुंबातील एकुलता एक मुलगा शुभज्योती बसूने पूजासोबत लग्न केले. लग्न घाईघाईत पार पडले. या लग्नामुळे दोन्ही पक्षांचे कुटुंब आनंदी होते. लग्न होऊन एक महिना उलटून गेला.
पती-पत्नी जोडीने नातेवाईक आणि मित्रांना भेटायला जात होते. त्यामुळे एकंदरीत सर्व काही व्यवस्थित चालले होते असे म्हणता येईल. एके दिवशी पत्नी पूजा शुभज्योतीला तिची मैत्रीण शर्मिष्ठा हिला भेटण्यासाठी तिच्या घरी घेऊन गेली. शर्मिष्ठा यांचा पती एका गुन्ह्यात तुरुंगात असताना या तिघांची भेट झाली.
भेटून दोघे घरी परतले. त्याच दिवशी पुन्हा हे नवीन जोडप घराबाहेर पडल. मात्र यावेळी केवळ पत्नी पूजा घरी परतली. पण नवरा परतला नाही. त्यामुळे शुभज्योती बेपत्ता असल्याची तक्रार पुजाच्या सासरच्या मंडळींनी केली होती. सासरच्यांची कोणतीही पूर्व तक्रार न घेता पोलिसांना मृ-त-दे-ह सापडला होता.
या शरीरावर एक टॅटू होता. टॅटूचा फोटो दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला. तसेच हा टॅटू शुभज्योतीच्या कुटुंबीयांनी पाहिला आणि मृ-त-दे-हाची ओळख पटली. त्यामुळे शुभज्योतीची ह-त्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत शुभज्योतीच्या नातेवाईक आणि मित्रांची चौकशी करण्यात आली.
शुभज्योतीची पत्नी पूजा हिचीही चौकशी सुरू आहे. पूजा नेहमी वेगवेगळी माहिती देत होती आणि तसेच ती घाबरलेली दिसत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कसून तपास केल्यावर पूजाला घटनास्थळी नेण्यात आले आणि घटनेची पुनरावृत्ती करण्यास सांगितले. त्याचवेळी घाबरलेल्या पूजाने सर्व दोष उघड केले.
मैत्रीण आल्यानंतर काय झालं?
पत्नी पूजा शुभज्योतीला तिची मैत्रिण शर्मिष्ठाला भेटण्यासाठी तिच्या घरी घेऊन गेली होती. त्यावेळी शुभज्योतीने पहिल्यांदा शर्मिष्ठा पाहिले आणि त्याला ती आवडली. त्यामुळे शुभज्योती हात धुवून शर्मिष्ठा च्या मागे लागला होता, शर्मिष्ठाने ही गोष्ट पूजाला सांगितली, यानंतर पूजाने आपल्या पती शुभज्योतीला समजावून सांगत शर्मिष्ठापासून दूर राहण्यास सांगितले. पण शुभज्योतीने पूजाला धमकावले. शुभज्योतीचे शर्मिष्ठावर एकतर्फी प्रेम होते.
हत्येचे असे षड्यंत्र केले
तुरुंगात असलेल्या शर्मिष्ठाचा पती तुरुंगातून बाहेर आला होता. या घटनेची माहिती शर्मिष्ठा यांनी पतीला दिली होती. पतीच्या या कृतीचा पूजालाही राग आला होता. त्यामुळे या तिघांनी शुभज्योतीच्या ह-त्येचा कट रचून त्याची ह-त्या केली. आणि आपल्याला काही माहीतच नाही असे त्याची पत्नी वागत राहिली.
त्याची ओळख उघड होऊ नये म्हणून त्याचा शिरच्छेद करून फेकून देण्यात आला. अश्याप्रकारे पत्नी आणि तिच्या मैत्रीण तसेच मैत्रिणीचा नवरा यांच्याकडून शुभज्योतीची निर्घृणपणे ह-त्या करण्यात आली. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी पूजा आणि तिची मैत्रीण शर्मिष्ठा यांना अटक केली होती.