आम्ही अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत, जे जाणून घेतल्यावर आणि ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, अशाप्रकारे जगात अनेक लोक त्यांच्या आवडीनुसार प्राणी आणि पक्षी पाळतात तर काही लोकांना गाय पाळण्याची खूप आवड असते. काहीजण आपापल्या व्यवसायानुसार गायी घरीही पाळतात.
आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एका पाळीव गायीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवल्याची घटना समोर आली आहे. तिला दागिनेही घातले जातात, त्याचप्रमाणे एका व्यक्तीने आपल्या गायीला दिवाळीच्या गाईपूजेसाठी सजवले होते, दागिन्यांसह तिच्या अंगावर सोन्याची साखळी देखील घालण्यात आली होती.
आणि नंतर चुकून त्या गायीने ही साखळी गिळली. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कर्नाटकातील एका शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला आपली गाय सजवने चांगलेच महागात पडले आहे, आणि त्यांनी तिला सोन्याची चेनही घातली.कर्नाटकातील शेतकरी आणि त्याची पत्नी यांनी गाय आणि तिच्या वासराला फुलांनी सजवले,
दिवाळीच्या पूजेच्या निमित्ताने त्या व्यक्तीने गायीला 20 ग्रॅम सोन्याची चेनही घातली, पण दागिने घालणे खूप त्रासदायक ठरले. गायीने ही साखळी गिळली, त्यानंतर एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत हेगडे असे नाव असलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने गाय पूजेपूर्वी तिची गाय आणि वासरू यांना फुलांच्या दागिन्यांनी सजवले होते.
गाईवर 20 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती.पूजेनंतर दुसऱ्या दिवशी दाम्पत्याने गायीचे दागिने काढून एका जागी ठेवले. दाम्पत्याने फुलांच्या हारासह सोनसाखळी ठेवली. गाईने फुलांच्या माळा खाल्ल्याने सोनसाखळीही गिळंकृत झाली.यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. 35 दिवस त्यांनी शेणखतावर लक्ष ठेवले.
आणि सतत तपासले की शेणाद्वारे साखळी बाहेर येईल, त्यांनी आपली गाय कुठेही बाहेर पडू दिली नाही. 4 वर्षांची गाय 35 दिवस घरात राहिली. पण तिच्या शेणातून साखळी बाहेर आली नाही.यानंतर शेतकरी श्रीकांत गाईला डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेथे तिची मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली. गाईच्या पोटात खरच सोन होत की नाही?
गायीने चैन गिळली आहे का? उत्तर आहे, होय. मात्र आता ही साखळी कशी बाहेर काढली जाईल, हा मोठा प्रश्न होता, ही साखळी गायीच्या पोटात कुठे अडकली आहे, हे डॉक्टरांनी स्कॅनरद्वारे शोधले. यानंतर पथकाने गायीचे पोट फाडून त्यातील साखळी बाहेर काढली. मात्र लगेचच साखळी बघून शेतकरी आणि त्याच्या पत्नीच्या होश उडाले.
20 ग्रॅमची साखळी गायीच्या पोटात गेल्याने ती 18 ग्रॅमपर्यंत कमी झाली. साखळीचा एक छोटासा भाग गाईच्या आत होता, त्यासाठी डॉक्टरांनी गाईच्या पोटाची तपासणी केली पण काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र 18 ग्रॅमची सोनसाखळी मिळाल्याने दाम्पत्याला आनंद झाला. पण एका चुकीमुळे आपल्या गायीला एवढ्या त्रासातून जावे लागल्याचे खेद व्यक्त केला.