फिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…”

entertenment News

बिहारमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. फिलीपाईन्समधील एक तरुणी बिहारमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर तिने आपले प्रेमही व्यक्त केले. मुलालाही ती आवडली. अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर तरुणी व्हिसाची वाट पाहू लागली. तिला भारतात येण्याचा व्हिसा मिळताच ती लगेच इथे आली.आणि या परदेशी तरुणीने थेट बिहार गाठून तिच्या वरासोबत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाची संपूर्ण गावात चर्चा आहे. परदेशी वधू आणि देसी वराची जोडी प्रत्येकाला पाहायची आहे.

चला तर मग जाणून घेऊया दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि कशी लग्नापर्यंत पोहोचली. धीरज प्रसाद हा गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो येथील फुलवारिया ब्लॉकमधील मुरार बत्राहा गावचा रहिवासी आहे. तो फिलीपिन्समध्ये काम करतो. तिथे तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे.

इथेच त्याची भेट व्हेलमुन डुमरा या फिलिपिनो मुलीशी झाली. दोघांच्या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले. हळू हळू दोघे जवळ येऊ लागले. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मुलीला बिहारमधील मुलगा इतका आवडला की तिने त्याच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नासाठी बिहारला जाण्याचे ठरले. मुलीच्या संपूर्ण कुटुंबाने व्हिसासाठी अर्ज केला होता पण फक्त मुलीला व्हिसा मिळाला. वेलमुन व्हिसा घेऊन भारतात आली होती. धीरज आणि त्यांचे १८ मे रोजी लग्न झाले. परदेशी सुनेने भारतीय परंपरेनुसार लग्न केले.

तिला हिंदू धर्म आणि चालीरीतींची माहिती नसतानाही तिने हिंदू पद्धतीने लग्न केले. तिला अजून हिंदीही बोलता येत नाही. त्याचवेळी या दोघांची जोडी पाहण्यासाठी लोकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाला वधू-वरांना पाहायचे होते. लग्नानंतर मुलगी खूप आनंदी आहे आणि ती म्हणते की आता ती तिच्या पतीसोबत राहणार आहे.

त्याचबरोबर धीरजचे भाऊ पंकज आणि नीरज हे देखील लग्नामुळे खूप आनंदी आहेत. ते म्हणतात की भावाने खूप योग्य गोष्ट केली आहे. ती नेहमी त्याच्यासोबत असेल. या लग्नाची गावात जोरदार चर्चा होत आहे. गोपालगंजमध्ये पहिल्यांदाच परदेशी वधू लग्न करून आल्याचे लोक सांगतात. त्यामुळे गावातील लोक सुध्दा खूप खुश आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.