‘शेर शिवराज’ च्या दिग्दर्शकावर भडकले अमोल कोल्हे? बोलले असं काही जे ऐकून डायरेक्टर ने मागितली जाहीरपणे माफी, कारण ऐकून धक्का बसेल पहा Zoom करून…”

Entertenment

काही दिवसांपूर्वी दिग्पाल यांच्या फेसबुक अकाउंटवरून सिनेमाशी संबंधीत एक पोस्ट शेअर करण्यात आली. नेमकी याच पोस्टवर डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला. यासंबंधीत एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपला राग व्यक्त केला. व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे म्हणाले की, ‘एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल. पण माझा त्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझं नाव घेण्यात आलं. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मी पोस्ट करणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला पाहिजे पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात.’

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था…’, डॅडीचा जावई अक्षय वाघमारे संतापला, अमोल कोल्हे यांनी नेमकी कशावर घेतला आक्षेप
व्हिडिओमध्ये अमोल पुढे म्हणाले की, ‘दैनंदिन मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मीच तो असं समजणारा आणि त्यासोबतच माझ्या आडनावाचा वापर करून आक्षेपार्हरितीने अनेक गोष्टी करण्यात आल्या. मी माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

असं असतानाही अशा पोस्ट लिहिल्या जात असतील हे फार वाईट आहे. अशा पद्धतीच्या पोस्ट लिहून त्या शेअर करून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा जो प्रयत्न सुरू आहेत तो दुर्देवी आहे आणि ही माझी संस्कृती नाही.’ असे अमोल कोल्हे म्हणाले. दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुकवर ‘शेर शिवराज’ सिनेमाचं कौतुक करणारी एक पोस्ट करण्यात आली.

या पोस्टमध्ये एक मुद्दा हा अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हे यांच्याविरोधात होता. ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा..’

याच मुद्द्यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला. यानंतर दिग्पाल यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करून अमोल कोल्हे यांची जाहीर माफी मागितली. या व्हिडिओमध्ये दिग्पाल म्हणाले की, ‘खासदार अमोल कोल्हे यांची एक पोस्ट मी पाहिली. माझ्या फेसबुक पोस्टवर त्यांनी आपलं मत मांडलं. ही पोस्ट माझ्या एका चाहत्याने केली होती.

अनेक चाहते शेर शिवराजच्या प्रदर्शनानंतर पोस्ट शेअर करत होते, टॅग करत होते. यात अनावधानाने सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट शेअर केली गेली. पण जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा काही मिनिटांत ही पोस्ट उडवली गेली. पण याचा स्क्रीनशॉट कोणी काढला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलवला असेल.’ ‘

मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. तसेच कोणत्याहीप्रकारे त्यांचा अशाप्रकारे अनादर करण्याची माझी कधीच भूमिका नसेल हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं नाही. पण तरीसुद्धा मी त्यांची माफी मागतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *