प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? फेब्रुवारी महिना येतोच मुळी प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साइट्स ओसंडून वाहू लागतात. अब्जावधी डॉलर्सच्या असतात या उलाढाली.
यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग खूप आधीपासून सुरू असते आणि याच चकव्याला माणूस भुलून जातो. आपल्याला ही प्रेयसी किंवा प्रियकर हवाच या भावनेने माणूस पछाडतो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच महत्त्वाचे जीवितकार्य आहे; नव्हे याचसाठी त्याचा किंवा तिचा जन्म झाला आहे, असे वाटू लागते. मग ते प्रेम मिळविण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थराला जाऊ शकतात.
आता अशीच काहीशी थोडी विचित्र अशी एक घटना प्रेमाच्या बाबतीत घडली आहे. चला तर मग जाणून घेऊ की नेमके काय घडले आहे. आपणास सांगू इच्छितो की या प्रेम प्रकरणात दोन मुले चक्क एकाच मुलीच्या प्रेमात पडले मात्र त्यानंतर या दोघांनी ही या मुलीकडे एकत्र जाऊन तिच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
परंतु झाले असे की ही मुलगी या दोन मुलांपैकी एकाला सुद्धा निवडू शकली नाही. म्हणून तिने या दोघांनाही आपला प्रियकर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुलीने तिच्या मनातील ही गोष्ट या दोघांना सांगितली आणि हे दोन्ही मित्र सुद्धा या मुलीचे प्रियकर होण्यास सहमत झाले. त्याचवेळी आता हे तिघे सुद्धा एकत्र राहत आहेत आणि आता ते मुलाला जन्म देण्याचा विचार करत आहेत.
खरं तर ही विचित्र घटना पॅरिसची आहे. बातमीनुसार, डिनो डी सौझा हा 40 वर्षांचा आहे आणि त्याचा मित्र साॅलो गोम्स हा 30 वर्षांचा आहे. तर या दोघांची प्रियसी ओल्गा ही 27 वर्षांची आहे. हे तिघेही गेल्या दीड वर्षापासून एकमेकांसोबत एकत्र राहत होते. आता, त्यांनी एकत्र मुलाची योजना आखली आहे.
डिनो डी सौझा यांनी माध्यमांना सांगितले की, ‘मी आणि साओलो दोघेही बार्सिलोना मधील चॅम्पियन्स लीग बघायला आलो होतो. त्यानंतर आम्ही तिथे ओल्गाला तिच्या काही मित्रांसह पाहिले. त्याच वेळी आम्ही तिला ड्रिंक करण्यास आमंत्रित केले. जे तिने स्वीकारले आणि येथूनच आमची तिघांची कहाणी सुरू झाली.
तसेच दिनो त्यांच्या नात्याबद्दल म्हणाला की आमच्यासाठी हा तिन्ही लोक एकत्र असल्याचा काही प्रश्नच नाही, खरं तर आमच्या तिघांमध्ये देखील चांगली केमिस्ट्री आहे. या प्रकरणात आमच्या तिघांमध्ये देखील खूप चांगले संबंध आहेत. आम्हाला माहित आहे की इतरांना काय आवडते आणि काय नाही.
त्यामुळे आम्ही लोकांचा विचार करत नाही आणि आम्ही तिघे सुद्धा एकत्र राहतो. हाती आलेल्या वृत्तानुसार, हे तिघे गेल्या दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकत्रच एका घरात सुद्धा राहत आहेत. तसेच हे तिघे अनेक वेळा रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण करतात आणि एकत्र वेळ सुद्धा घालवतात.
तथापि, जेव्हा त्याच्या कुटुंबीयांना सुरुवातीला या नात्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांतील सदस्यांनी याला विरोध केला. पण या तिघांनी सुद्धा आपल्या घरातील लोकांचे काही ऐकले नाही. यावर ओल्गा म्हणते की बरेच लोक या अनोख्या नात्याबद्दल बरीच चर्चा करतात आणि बर्याच नकारात्मक टिप्पण्या देखील देतात.
या गोष्टी ऐकून आम्हाला वाईट वाटतं, परंतु लोकांच्या या प्रतिक्रियांना आम्ही उत्तर देत नाही. तर दिनो म्हणतो की मी या दोघांपेक्षा मोठा आहे. पण माझा स्वभाव एखाद्या लहान मुलासारखा आहे. तर शौलो हा गंभीर असून आम्हा तिघांनाही एकत्र ठेवतो. तर ओल्गा ही नेहमीच व्यस्त असते तरी पण दोघांना तिचे पूर्ण प्रेम देऊन ती एकत्र ठेवते.
आता बाळाची योजना आखत आहेत:- हे तिघेही सध्या फ्रान्सच्या टूलूस या शहरात एकत्र राहत आहेत आणि आता ते आपल्या मुलाचा विचार करत आहेत. ते म्हणाले की आमच्या आयुष्यात आम्हाला मुले हवी आहेत. डिनोच्या म्हणण्यानुसार ओल्गा ही माझी आणि साऊलोच्या मुलाची आई व्हावी अशी आमची तिघांची सुद्धा इच्छा आहे.
तसेच आम्ही जगभर फिरण्याचे स्वप्न पाहत आहोत आणि आपला व्यवसाय देखील वाढवत आहोत. तर आपल्याला या प्रेम कहाणी बद्दल काय वाटते हे नक्की सांगा.