तुम्ही आजपर्यंत भाड्याने मिळणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल ऐकले असेल,पण आता अशीच एक गोष्ट न्यूयॉर्कमध्ये भाड्याने मागवली जात आहे जी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.वास्तविक,न्यूयॉर्कमधील एका महिलेने बॉयफ्रेंडची मागणी करणारी एक जाहिरात टाकली आहे.
जी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे महिलेने ही जाहिरात स्वतःसाठी नाही तर सासूसाठी दिली आहे.या जाहिरातीत महिलेने सासूसाठी प्रियकराची मागणी केली आहे.दोन दिवस सासूसोबत राहणाऱ्या व्यक्तीला ७२ हजार रुपये दिले जातील,असे जाहिरातीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,न्यूयॉर्कच्या हडसन व्हॅलीमधील एका महिलेने क्रेगलिस्टवर तिच्या 51 वर्षीय सासूसाठी जोडीदार शोधत जाहिरात दिली आहे.जाहिरातीत असे लिहिले आहे की,तिला तिच्या सासूसाठी असा जोडीदार हवा आहे,जो तिच्यासोबत लग्न आणि डिनरला उपस्थित राहू शकेल.
त्या व्यक्तीला दोन दिवस सासूकडे राहावे लागेल. आणि त्यासाठी त्याला एक हजार डॉलर म्हणजेच ७२ हजार रुपये मिळतील.खरंतर या महिलेला एका लग्न समारंभाला हजेरी लावायची आहे,ज्यामध्ये तिला सासू-सासऱ्यांना जोडप्याप्रमाणे सोबत घेऊन जायचे आहे.
या आगळ्यावेगळ्या जाहिरातीत या सर्व गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत.यासोबतच व्यक्ती कशी असावी हेही सांगितले आहे.या जाहिरातीनुसार उत्तम नृत्यांगना,बोलण्यात अस्खलित आणि 40 ते 60 वयोगटातील व्यक्ती या कामासाठी योग्य असेल.हे स्पष्टपणे लिहिले आहे.
भाड्याने घेतलेल्या व्यक्तीला सासूसोबत जोडप्यासारखे राहावे लागेल.ज्यासाठी पैसे दिले जातील.ही जाहिरात रेडिटवर शेअर केल्यानंतर ती खूप वेगाने व्हायरल झाली आहे.लोक हे प्रचंड शेअर करत आहेत. आणि भरपूर कमेंटही करत आहेत.काही जणांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनाही अर्ज करण्यासाठी कळवले.