आजकाल आपण बघतो की,फिल्म इंडस्ट्री मधून अनेक शोकांतिका समोर आल्या आहेत.बॉलीवूड मधील मोठ मोठे दिग्गज कलाकार गेल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो.त्यातील काही जण वृद्ध झाल्याने गेले,तर काही अकाली मृ-त्यू ने गेल्याचे आपल्याला दिसून येते.
आताच काही दिवसांपूर्वी सिध्दार्थ शुक्ला यांच्या नि-धनाच्या बातमीने सगळी इंडस्ट्रीमध्ये शोकांतिका पसरली होती.त्यांच्या आधी आणि नंतर ही मोठ मोठे दिग्गज हे जग सोडून गेले.इंडस्ट्रीतील कोणी कलाकार जग सोडून गेले की,असे वाटते कोणीतरी आपल्यातला आपला माणूस आपल्याला सोडून गेला.
आणि तसेच संपूर्ण इंडस्ट्रीमध्येही अत्यंत शोकाचे वातावरण निर्माण होते.कारोना मुळे बऱ्याच दिवस बॉलीवूड आणि इतर साऊथ इंडियन,हॉलिवूड यांचे मनोरंजनाचे काम बंद राहिले.आता जिथे हे सगळे सुरळीत सुरू होऊ बघताय तिथे फिल्म इंडस्ट्रीमधील आणखी एक बातमी समोर येत आहे.
विद्या बालन,इमरान हाश्मी आणि नसीरुद्दीन स्टारर सुपरहिट चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’मध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा मृ-त-देह दक्षिण कोलकाता येथील जोधपूर पार्क येथील तिच्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला आहे.ए-बी-पी न्यूजने लेक सिटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या बातमीला दुजोरा दिला आणि सांगितले की, तिच्या मृ-त्यूचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलीस अधिकाऱ्याने ए-बीपी न्यूजला सांगितले की,तिच्या मृ-त्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समजेल.
आणि तिच्या मृ-त्यूचा प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे.आणि यामागचा तपास पूर्ण झाल्यानंतर सगळा उलगडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.उल्लेखनीय आहे की,’द डर्टी पिक्चर’मध्ये काम करण्याव्यतिरिक्त आर्या बॅनर्जीने सुप्रसिद्ध फिल्ममेकर दिबाकर बॅनर्जी यांच्या सोबतही काम केले आहे.
दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह से-क्स और धोका’ या चित्रपटातही तिने काम केले होते.आर्या प्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.आर्या ही तिच्या सोशल मीडिया वर खूप ॲक्टिव होती.तिचे लाखो फॉल्लॉवर आहेत.जे तिच्या नवनवीन पोस्टसाठी वाट बघत असतात.