या महिलेने एकाच वेळी दिला जवळपास 7 मुलांना जन्म, पण त्यांनतर जे झालं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले डॉक्टरसुद्धा…’ पहा काय झाले

Entertenment

आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानची बातमी सांगणार आहोत,जिथे एका महिलेने एकाच वेळी 7 मुलांना जन्म दिला आहे.एकाच वेळी इतक्या मुलांचा जन्म हा चमत्कारापेक्षा कमी नाही.ही बातमी पख्तुनख्वामधील अबोटाबाद शहरातील आहे,जिथे मोहम्मद नावाच्या व्यक्तीला चार मुले आणि तीन मुली आहेत.या मुलांच्या जन्मामुळे आपण खूप आनंदी असल्याचे तो सांगतो.

यार मोहम्मद हे बटग्राम जिल्ह्यातील रहिवासी आहेत,त्यांच्या पत्नीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिना इंटरनॅशनल टीचिंग हॉस्पिटलमध्ये सात मुलांना जन्म दिला आहे.रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सर्व नवजात बालके आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.

अबोटाबादच्या जिना हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ हिना फय्याज यांच्या म्हणण्यानुसार,शनिवारी पहिल्यांदाच त्यांच्याकडे आलेल्या महिलेने सांगितले की,“अल्ट्रासाऊंड आणि इतर अहवालांवरून आम्हाला कळले की,तिला पाच मुले आहेत.आणि हे आठ महिन्यांच्या गर्भाधारणे नंतर तिची डिलिव्हरी करण्यात आली.

“डॉक्टर हिना फयाज सांगतात की त्या दिवशी तिची ड्युटी ओपीडीमध्ये होती,तिने सांगितले की तिने तिच्या विभागाच्या प्रमुख,प्रोफेसर डॉ रुबिना बशीर यांच्याशी बोलले.त्यांनी लगेच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.एवढ्या मोठ्या ऑपरेशनसाठी आपत्कालीन स्तरावर तयारी करण्यात आली होती.

बालरोग वॉर्डातील तज्ज्ञ डॉक्टरांना इमर्जन्सी कॉल देण्यात आला.यामध्ये तीन ज्युनियर टीएमओ डॉक्टर शाहीला,डॉ मरियम आणि डॉ राबिया याशिवाय पॅरामेडिक्स आणि अॅनेस्थेसियाच्या डॉक्टरांनीही मदत केली.त्यानंतर या मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

अल्ट्रासाऊंडमध्ये अनेकदा बाळांची नेमकी संख्या कळत नाही,त्यांना 6 बाळं असल्याचे आढळून आले,किट सुद्धा सहा बाळांसाठी तयार करण्यात आली होती,परंतु जेव्हा बाळ आईपासून वेगळे होऊ लागले तेव्हा असे आढळून आले की ही सात मुले आहेत.डॉक्टर म्हणतात की हे फारच दुर्मिळ आहे की,

सर्व बाळ सहसा जिवंत आणि बरे नसतात. बाळांना रुग्णालयाच्या पाळणाघरात आणि आईला आयसीयू वॉर्डात हलवण्यात आले असून,बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे.मुलांना पाहून त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला.अशी प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात.

हा सर्व प्रकार झाल्यांनतर कुठल्याही बाळाला किव्हा बाळांच्या आईला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि देवाचा हा करिष्मा पाहून डॉक्टरांच्या सुद्धा आले डोळ्यात पाणी. सर्व कामगार वर्ग नर्स यांनाही अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *