खूप दिवसांपासून या महिलेच्या कानात येत होती ‘खाज’ म्हणून गेली डॉक्टरांकडे, पण डॉक्टरांनी जेव्हा कॅमेरा लावला तेव्हा त्यांना आतमध्ये दिसली एक विचित्र गोष्ट, जी पाहिल्यावर मोठं-मोठ्याने रडायला लागली महिला…”

Entertenment

चीनचे एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.जिथे एका महिलेच्या कानात खाज येत होती.त्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली.मायक्रो कॅमेऱ्याच्या सहाय्याने केलेल्या तपासणीत डॉक्टरांना जे आढळले ते थक्क करणारे होते.कानात खाज येणे अनेक वेळा सुरू असते.

आणि त्यामागे अनेक सामान्य कारणे असतात.आपल्याला वाटते की हा एक सामान्य संसर्ग असू शकतो.परंतु अनेक वेळा असे होत नाही.अशीच एक घटना चीनमध्ये पाहायला मिळाली.हे प्रकरण चीनच्या हुनान प्रांतातील झुझोउ शहराचे आहे.तिथे राहणाऱ्या एका महिलेच्या कानात इतकी भयंकर खाज सुटली की,

तिला डॉक्टरकडे जावे लागले.ईएनटी तज्ञांना वाटले की हा एक सामान्य संसर्ग असेल परंतु जेव्हा त्यांनी महिलेच्या कानात खाज येण्याचे कारण जाणून घेण्यासाठी मायक्रो कॅमेरा घातला.तेव्हा कारण जाणून घेतल्यावर तेथील सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला.

महिलेच्या कानात लावलेल्या कॅमेऱ्यातून आतील दृश्य बाहेर आल्यावर डॉक्टर आणि महिलेला आश्चर्याचा धक्का बसला.महिलेच्या कानात एक कोळी आरामात राहत होता.आणि त्याने जाळी बनवायलाही सुरुवात केली.हा कोळी काही लहान नव्हता.तर त्याला 8 पाय होते आणि कानाच्या आत रेंगाळत होते.

मात्र,कॅमेऱ्याच्या लेन्समुळे ती तिच्या खऱ्या आकारापेक्षा मोठी दिसत होती.महिलेने सांगितले की,कानाला खाज सुटण्याच्या एक दिवस आधी ती कुठेतरी बाहेर गेली होती.बाहेरून आल्यावर खाज सुटली आणि नंतर वाढतच गेली.तिला वाटलं कानात इन्फेक्शन झाले असावे.

असे काही कारण असेल याची डॉक्टरांना कल्पना नव्हती.कॅमेऱ्यातून कोळी पाहिल्यानंतर लगेच त्याला बाहेर काढण्याची तयारी सुरू केली.डॉक्टरांनी इलेक्ट्रिक ओटोस्कोपच्या सहाय्याने कानातला कोळी बाहेर काढला,त्यानंतर कुठेतरी महिलेला आराम मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *