राजस्थानची राजधानी जयपूरमधून माणुसकीला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे,जी गोष्ट करण्यापूर्वी राक्षसानेही विचार करावा.येथे वॉर्ड बॉयने एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णावर रात्रभर ब-ला-त्का-र केला.
आश्चर्याची बाब म्हणजे ऑपरेशननंतर महिला रुग्णाच्या तोंडाला ऑक्सिजन टाकून दोन्ही हात बांधलेले असताना आरोपीने हा गु-न्हा केला.ही घृणास्पद घटना जयपूरच्या शाल्बी हॉस्पिटलची आहे.जिथे सोमवारी रात्री आयसीयू वार्डमधील पुरुष नर्सिंग कर्मचारी खुशीराम गुर्जर याने महिला रुग्णासोबत हे क्रूर कृत्य केले.
पीडिता बोलण्याच्या स्थितीत नसल्याने तिने सकाळी हातवारे करून ही गोष्ट पतीला सांगण्याचा प्रयत्न केला,मात्र तो समजू शकला नाही,असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.यानंतर पीडितेने तिची अग्नीपरिक्षा लिहून सांगितली तेव्हा तिच्या पतीच्या पायाखालची जमीन सरकली.
यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करून त्याला अटक करण्यात आली.ही घृणास्पद घटना घडवत असताना आरोपीला महिलेची किंचितही दया आली नाही.काही तासांपूर्वीच तिची शस्त्रक्रिया झाली होती,ती वेदनेने ओरडत होती आणि हा हैवान त्याची वासना पूर्ण करत होता.
यादरम्यान पीडिता अनेक वेळा बेहोशही झाली. आणि आरोपी महिलेला ती शुद्धीत आहे की नाही हे पाहण्यासाठी वारंवार चिमटे काढत होता.तिची प्रकृती एवढी चांगली नव्हती की,ती किंचाळू शकेल,आणि कोणाला बोलवू शकेल.पण या नराधमाने याचाच फायदा घेतला.
या कृत्याबाबत कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला असता,जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेला गप्प केले.महिला रुग्णाशी नराधमासारखे कृत्य करणारा आरोपी खुशीराम गुर्जर हा मूळचा करौली जिल्ह्यातील नादौती गावचा रहिवासी आहे.तो येथे कनोटा परिसरात भाड्याने राहतो.
जयपूरच्या शेल्बी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग वर्कर म्हणून काम करतो.तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवून शोध सुरू केला.त्यानंतर मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. (आरोपी नर्सिंग वर्कर खुशीराम गुर्जर)
सोमवारी सायंकाळी पत्नीला दाखल करून घेतल्याचे पीडितेच्या पतीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सायंकाळी तिची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.रुग्णालयाच्या नियमांनुसार कोणालाही आयसीयूमध्ये राहण्याची परवानगी नाही.परिचारिकांनी सांगितले की,
जेव्हा गरज असेल तेव्हा त्या तुम्हाला फोन करून बोलवतील.त्यामुळे मी रात्री माझ्या घरी गेलो.पण आपण जीव वाचवण्यासाठी इथे आलो आहोत असे मला वाटत होते,पण इथे तर आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते.या प्रकरणाचा तपास करत असलेले जयपूरचे डीसीपी प्रदीप मोहन शर्मा यांनी सांगितले की,
हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल,त्यानंतर त्याच्या शिक्षेचा निर्णय होईल.त्याने सांगितले की,पीडितेचा पती काल संध्याकाळी चित्रकूट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला होता.आणि त्याने तक्रार दाखल केली होती.आरोपीला आग्रा रोड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.