मैत्री हे असं नातं आहे ज्यात एकमेकांपासून काहीही लपत नाही.विश्वास हाच या नात्याचा पाया आहे.जेव्हा तो तुटतो तेव्हा हृदय तुटते.एका महिलेसोबत तिच्या मैत्रिणीने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ती मैत्रिणीच्या मुलाचे डायपर बदलत असताना ही फसवणूक उघडकीस आली आहे.गरोदरपणानंतर,आपल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी गेलेल्या महिलेला समजले की,तिच्या पती आणि मैत्रिणीचे तिच्या पाठीमागे इतके खोल प्रेम होते की,त्यांना एक मूल देखील होते.
आता तुम्ही विचार करत असाल की,मुलाचे डायपर बदलल्यानंतर फसवणूक कशी समोर आली असेल? चला तर मग जाणून घेऊया..ही घटना 4 मुलांच्या आईसोबत घडली,जेव्हा तिच्या मैत्रिणीची प्रसूती झाल्यानंतर ती तिच्या मदतीसाठी मैत्रिणीच्या घरीच थांबली होती.
नवजात बाळाचे डायपर बदलताना महिलेला त्याच्या शरीरावर नेमके तेच जन्मखूण दिसले,जे तिच्या पती आणि मुलाच्या शरीरावर आहे.ही खूण पाहून ती महिला थोडा वेळ गोंधळली.आणि मग तिने डोक्याचा वापर केला आणि या प्रकरणाचा छडा लावला.
डेली स्टारच्या वृत्तानुसार,महिलेने स्वतः तिच्या मैत्रिणीला सांगितले होते की,ती तिला मदत करण्यासाठी तिच्याजवळ थांबेल.आणि प्रेग्नेंसी तसेच डिलिव्हरी नंतरही तिची मदत करेल. परंतु मुलाच्या जन्मानंतर तिला मैत्रिणीच्या मुलाच्या शरीरावर दोन जन्मखूण दिसल्या होत्या.
जसे तिच्या स्वतःच्या मुलाच्या शरीरावर दिसत होत्या.हे गुण मुलाला त्याच्या वडिलांकडून वारशाने मिळालेले असतात.अशा परिस्थितीत जेव्हा तिने जन्मखूण पाहिली.तेव्हा तिला समजायला वेळ लागला नाही की,तिच्या मैत्रिणीचे मूल हे खरे तर तिच्या पतीचेच मूल आहे.
मुलीच्या मानेवर तिच्या बाकीच्या मुलांप्रमाणेच खुणा होत्या.TikTok व्हिडिओद्वारे तिचा मुद्दा सांगताना ती महिला म्हणते की,जेव्हा तिने हे जन्मखूण पाहिले,तेव्हा तिची मैत्रीणही जवळच होती.आम्ही एकमेकींना पाहिले आणि मी तिचे घर सोडले.आणि थेट स्वतःच्या घराकडे निघाले.
मात्र,त्यापूर्वीच महिलेच्या मैत्रिणीने हे मूल तिच्या पतीचे असल्याचे मान्य केले होते.परंतु महिलेच्या पतीने 6-7 महिन्यांनी हे मान्य केले.आणि ते दोघे वेगळे झाले.माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि माझी मुले भाऊ-बहीण असल्याने तिने तिच्या मैत्रिणीसोबतचे नाते तोडल्याचे महिलेचे म्हणणे आहे.