परदेशात प्रेम जिव्हाळ्याचे नात्यातही आता पैशासाठी निभावले जात आहेत.एका 44 वर्षीय महिलेने तर आपल्या प्रियकराला पगारावर ठेवले.तिचा बॉयफ्रेंड वयाने त्या स्त्रीपेक्षा खूपच लहान आहे.ती स्त्री त्याला ठराविक पगार देते.
आणि त्या बदल्यात तिला हवे ते मिळते.ज्युली नावाच्या महिलेचे वय 44 असून तिने 29 वर्षांचा बॉयफ्रेंड बनवला आहे.या नात्याची माहिती खुद्द जुलीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्युलीने तिच्या नात्याबद्दल सांगितले की,
ती तिच्या 15 वर्षांनी लहान प्रियकराला निश्चित पगार देते.जेणेकरून ती त्याला काहीही करायला लावू शकेल.गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाते हे एकमेकांच्या आवडीनिवडीवर आधारित असते,पण या नात्याचा आधार एकमेकांवर प्रेम नसून फक्त गरज आहे.
म्हणजेच ज्युलीचा प्रियकर तिच्यासोबत फक्त पगारासाठी म्हणजेच पैशांसाठी राहतो.आणि ती म्हणेल तसे करायला त्याला भाग पाडते.महिलेने @julie.withthebooty नावाच्या TikTok अकाऊंटवर तिच्या नात्याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला.
आणि माहिती दिली की ती तिच्या प्रियकराला हवे ते सर्व देते.ती एका महिन्यात त्याच्यावर पगार म्हणून 15 लाख रुपये खर्च करते,म्हणजे वर्षाला ती बॉयफ्रेंडवर 1 कोटी 80 लाख रुपये खर्च करते.त्या बदल्यात मुलाला काय करायचे आहे?
ज्युलीने हा व्हिडिओ अपलोड केला.सर्व युजर्सनी तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.एका वापरकर्त्याने विचारले की पगाराच्या बदल्यात मुलाला काय करावे लागते.ज्युली म्हणाली, ‘मला जे हवं ते मी त्याला करायला सांगते.’जर त्याने हे काम केले नाही.
तर त्याचा पगार कापला जाईल.द सनच्या रिपोर्टनुसार,ज्युली तिच्या प्रियकराला स्वयंपाक करण्यापासून ते पूल साफ करण्यापर्यंत घरातील सर्व कामे करायला लावते,पण यावेळी तिचा प्रियकर पूल साफ करायला विसरला.त्यामुळे तिने त्याचा पगार कापला.