विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असून आज दोघेही अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत.राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्समध्ये हे जोडपे सात फेरे घेतील.एकामागून एक अपडेट्स सातत्याने जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच,
त्याचवेळी सोशल मीडियाच्या दुनियेत त्यांच्या लग्नाविषयीची एक अशी पोस्ट व्हायरल होत आहे,जी वाचून तुम्हाला हसू आवरनार नाही.ही मजेशीर पोस्ट ड्यु-रे-क्स कंपनीने केली आहे,जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.यूजर्स या पोस्टवर उत्स्फूर्त कमेंटही करत आहेत.
अशी पोस्ट ड्यु-रे-क्स कंपनीने शेअर केली आहे.ड्यु-रे-क्स इंडिया कंपनीने आपल्या इंस्टाग्रामवरून विकी आणि कतरिनाच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट केली आहे,या पोस्टमध्ये कंपनीच्या वतीने लिहिले आहे की, ‘प्रिय विकी आणि कतरिना,जर आपण आम्हाला बोलावले नाही.
तर तो नक्कीच विनोद होईल’.वास्तविक ड्यु-रे-क्स इंडिया ही कं-डो-म उत्पादक कंपनी आहे,त्यामुळे वापरकर्ते या पोस्टमधून अनेक अर्थ काढत आहेत. आणि उग्र कमेंट करत आहेत.यावर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले की, ‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे’.इतर वापरकर्ते देखील चुटकीसरशी अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.
कतरिना आणि विकीच्या लग्नाला देश-विदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती.या लग्नाला हजेरी लावण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही राजस्थानला पोहोचले आहेत.अशा परिस्थितीत त्याच्या लग्नाच्या आमंत्रणाची ही मजेशीर पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.