राजस्थानमध्ये विचित्र घटना घडली आहे, येथे लग्नानंतर एक वधूच अचानक बेपत्ता झाला. आता मुलगी आणि तिचे कुटुंबीय त्या वराचा शोध घेत आहेत. परंतु वराचा काही पत्ता लागत नाही आहे. हे प्रकरण राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील कुडगाव परिसराशी सं-बंधित आहे.
असे सांगितले जात आहे की त्याच्या हनिमूनच्या दुसर्या दिवशी तो वर रहस्यमयपणे गायब झाला. पण त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून त्याचा शोध घेतला. पण वराचा काही पत्ता लागू शकला नाही. नऊ दिवसांपासून नवविवाहित वधू आणि तिचे कुटुंब त्या वराची वाट पाहत आहेत.
परंतु वराचा कोणताही संदेश देखील त्यांना आला नाही. आता त्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसही त्या वराचा शोध घेत आहेत. पोलिसांत तक्रार देताना कुटुंबियांनी सांगितले की आशिषकुमार उर्फ गोलू यांचे नऊ दिवसांपूर्वी हिंडौन तहसीलमधील खेड्यात लग्न झाले होते.
लग्नाच्या दिवशी सर्व काही परिपूर्ण होते. पण लग्नाच्या दुसर्याच दिवशी आशिष कुमार हा गायब झाला. आशिषकुमार यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तो रात्री 12 वाजता शौचालयाला जात असल्याचे सांगून खोलीतून बाहेर पडला. नवविवाहित वधू आशिषच्या खोलीत बराच वेळ थांबली.
पण आशिष मात्र काही आला नाही. त्यानंतर त्या वधूने आपल्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली. आशिषचे कुटुंबिय देखील त्याचा शोध घेत आहेत. बराच काळ शोध घेतला तरी आशिष काही सापडला नाही. आशिषच्या घरातील लोकांनी त्याला त्याच्या फोनवर देखील कॉल केला. पण त्याचा फोन बंद लागत होता.
आशिष कोठेच सापडत नसल्याने घरातील लोकांनी विनाविलंब पोलिस स्टेशनमध्ये केस केली. आशिषचा भाऊ पुष्पेंद्र यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. आशिष अचानक गायब झाले असल्याचे त्याने असे त्याने पोलिसांना सांगितले. आशिषचा कोणाशीही वाद नव्हता आणि तो लग्नात आनंदी होता असेही हे कुटुंब सांगते.
तरी त्याने असे पाऊल का उचलेले हे देखील कोणाला कळत नव्हते. वराचा भाऊ पुष्पेंद्र याच्या सांगण्यावरून पोलिसांनी आशिष बेपत्ता असल्याची नोंद केली. आता पोलिस आशिषचा शोध घेत आहेत. परंतु अद्याप त्याच्याबद्दल काहीही माहिती झालेली नाही. आशिष बेपत्ता होऊन 9 दिवस झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषने जर त्याचा हा फोन स्वत: बरोबर घेतला असता तर त्याचा शोध घेणे सोपे झाले असते.
पण त्याने त्याचा फोन घरीच सोडला. ज्यामुळे हातात कोणताही क्लू उपलब्ध नाही. दुसरीकडे आशिषची पत्नीची तब्येत खराब होत आहे. पण नंतर पोलिसांना अधिक तपास केल्यावर कळाले की आशिष हा त्याच्या प्रियसी सोबत पळून गेला आहे आणि आता पोलीस त्याचा लवकरच शोध घेतील असे सांगितले जात आहे.